अधिकाऱ्यांवर डाफरणारे अजित पवार आमदाराच्या मुलाच्या लग्नातील सोशल डिस्टन्सिंगच्या फज्जावर मात्र गप्प

शासकीय बैठकीत कोणी जवळ येऊन माहिती द्यायला लागल्यावर अधिकाऱ्यावर डाफरणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदाराच्या मुलाच्या लग्नात मात्र स्वत:समोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असलेला पाहूनही गप्प बसले. Ajit Pawar silent on the fuss of social distancing in the marriage of the MLAs son


विशेष प्रतिनिधी

नाशिक : शासकीय बैठकीत कोणी जवळ येऊन माहिती द्यायला लागल्यावर अधिकाऱ्यावर डाफरणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदाराच्या मुलाच्या लग्नात मात्र स्वत:समोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असलेला पाहूनही गप्प बसले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाचे नाशिक येथे लग्न झाले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. मात्र, या लग्नात सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचा पुरता बोजवारा उडाला. मात्र, तरीही या मंत्र्यांनी काहीही केले नाही.

 चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी विवाह सोहळे व कार्यक्रमांवर सरकारने निर्बंध लावले आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये संख्या मर्यादित असावी, असे आदेशही सरकारनं दिले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमातच सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला.

Ajit Pawar silent on the fuss of social distancing in the marriage of the MLAs son

‘पालकमंत्री जिल्ह्याचे प्रमुख असतात; उपमुख्यमंत्री म्हणून सरकारचे दोन नंबरचे प्रमुख आहेत, ज्यांनी कायद्याचे पालन करायचे असते तेच जर अशा प्रकारे उपस्थित राहून कायद्याची पायमल्ली करत असल्यास सामान्य माणसांनी कायद्याची अंमलबजावणी करताना कोणाचा आदर्श ठेवायचा,’ असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*