बारामतीत अजितदादांची राजकीय बेरीज; अकोल्याच्या शेंडीत पवारांची मात्र वजाबाकी


विशेष प्रतिनिधी

पुणे : बारांमतीत बसून भाजप आमदाराशी चर्चा करत उपमुख्यमंत्री अजित पवार बेरजेचे राजकारण करत होते, त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार अकोले तालुक्यातील शेंडीत वजाबाकीचे राजकारण करताना दिसले… त्याचे झाले असे… साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज बारामतीत अजितदादांची भेट घेतली. ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती असे सांगून या बाबत अधिक बोलण्यास शिवेंद्रसिंहराजे यांनी नकार दिला. Ajit pawar political sum in Baramati Pawar deduction in Akola

शिवेंद्रसिंहराजे यांनी या भेटी संदर्भात अधिक माहिती दिलेली नसली, तरी बारामतीतून बेरजेचं राजकारण सुरु झाल्याची चर्चा आहे. मुख्य म्हणजे, शिवेंद्रसिंहराजेंनी विद्या प्रतिष्ठान संकुलातील व्हीआयआयटीच्या बंद खोलीत अजितदादांशी पंधरा मिनिटे चर्चा केली. नंतर पत्रकारांन गाठले असता त्यांनी फक्त मतदारसंघातील कामासाठी आलो होतो, त्यात वेगळे नव्हते असे सांगून ते तेथून निघून गेले. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचे पेव फुटले.दुसरीकडे अकोले तालुक्यातील शेंडी गावात माजी आमदार कै.यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी आपल्या भाषणातून चौफेर टोलेबाजी करत वजाबाकीचे राजकारण केले.

जशी एकजूट विधानसभेला ठेवली तशीच कायम ठेवा. आपआपसात मतभेद ठेवू नका’, असा संदेश पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. ‘पक्षात सर्वांना भरभरून दिले होते. काही जणांना राज्याचे नेतृत्व दिले, पक्षाची धुरा दिली पण तरीही ते पक्षाला सोडून गेले. अनेकजण सोडून गेले मात्र काही फरक पडत नाही. जनतेने निवडणूक हातात घेतली आणि त्यांचा पराभव झाला’, असे म्हणत पवारांनी मधुकर पिचड यांच्यावरील राग गेला नसल्याचेच संकेत दिले.

‘पवनचक्कीसाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना कंपनी मदत करत नाही ही खंत आहे. इथल्या साखर कारखान्याने एवढे मोठे कर्ज वाढवून ठेवले आहे. कारखान्याचे अस्तित्व टिकवायचे असेल तर झारीतला शुक्राचार्य बाजूला काढावा लागेल’, असे सांगत मधुकर पिचड यांचे राष्ट्रवादीत परतण्याचे दरवाजे बंद असल्याचे संकेत दिले. त्याच बरोबर पिचडांना बाजूला काढाल तरच मदत करू, अशी राजकीय मेख मारून ठेवली.

Ajit pawar political sum in Baramati Pawar deduction in Akola

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था