राज्याचे ऊजार्मंत्री मागासवर्गीय असल्यामुळेच वीज बिलाच्या प्रस्तावाला अर्थमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक अडचण निर्माण केली जात आहे. नाहीतर थकीत वीज बिलाचा प्रश्न कधीच मार्गी लागला असता, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट अजित पवार यांच्यावर केली.Ajit Pawar alleges difficulties in electricity bill proposal as Energy Minister is backward class, alleges Prakash Ambedkar
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : राज्याचे ऊजार्मंत्री मागासवर्गीय असल्यामुळेच वीज बिलाच्या प्रस्तावाला अर्थमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक अडचण निर्माण केली जात आहे. नाहीतर थकीत वीज बिलाचा प्रश्न कधीच मार्गी लागला असता, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट अजित पवार यांच्यावर केली.
आंबेडकर म्हणाले, लॉकडाऊन काळात वाढीव वीज युनिटच्या वाढीव दराबाबत ट्राय कोर्टाकडून सुनावणी होणे अपेक्षित आहे. तसा कायदा असतानादेखील ठाकरे सरकारने वीज बिलाच्या युनिट दरात दुपटीने वाढ केली आहे. वीज युनिटच्या दरात केलेली वाढ अगोदर सरकारने रद्द करावी.
उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले माफ करण्याचा प्रस्ताव केला होता. याबाबतची घोषणाही करण्यात आली होती. मात्र, अर्थ मंत्री अजित पवार यांनी त्याला विरोध केला होता.
मुंबईमध्ये मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली एक गाडी सापडली. याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रोज नवनवीन माहिती मिळत आहे. या प्रकरणात २२ तारखेला आम्ही राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असून, त्यांच्यासमोर पक्षाची भूमिका मांडणार आहोत, असे आंबेडकर यांनी सांगितले.