देशाच्या स्वाभिमानासाठी गरज पडल्यास सीमापार जाऊन युध्द, अजित डोवाल यांचा इशारा


  • देशाच्या स्वाभिमानासाठी गरज पडल्यास आम्ही सीमापार जाऊन युद्ध करु शकतो, असा इशारा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिला आहे.

वृत्तसंस्था

ऋषीकेश : देशाच्या स्वाभिमानासाठी गरज पडल्यास आम्ही सीमापार जाऊन युद्ध surgical strike करु शकतो, असा इशारा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिला आहे.  ऋषीकेश येथे गंगेच्या काठी असलेल्या परमार्थ निकेतन आश्रमाला भेट दिल्यानंतर डोवाल यांच्या हस्ते गंगा पूजन झालं. यावेळी ते बोलत होते. डोवाल म्हणाले की, इतिहास साक्षी आहे की भारताने कधीही कोणावर हल्ला केला नाही.

मात्र, देशाच्या स्वाभिमानासाठी गरज पडल्यास सीमाचं नव्हे तर सीमापार जाऊनही आम्ही युद्ध करु शकतो. नवा भारत वेगळ्या विचारांचा आहे. स्वाथार्साठी आम्ही कोणाला डिवचणार नाही मात्र, स्वाभिमानाच्या रक्षणासाठी कोणाला सोडणारही नाही. आपण जगातील मोठ-मोठ्या संस्कृतींचे पतन झालेले पाहिले आहे. तसेच नव्या संस्कृतींना विकसित होतानाही पाहिले आहे.

मात्र, भारतीय संस्कृती संपूर्ण जगात वेगळी आहे. शेकडो वर्षांपासून परदेशी आक्रमणं आणि गुलामी सोसल्यानंतरही कोणतीही बाहेरची संस्कृती या देशावर प्रभाव टाकू शकली नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपली अध्यात्मिक ताकद आहे. एक जवान भलेही सीमेवर भौतिक स्वरुपात सीमेचं रक्षण करीत असेल, मात्र देशात लाखो-करोडो लोक प्रत्यक्षात आपली संस्कृती आणि श्रद्धेसह राष्ट्राला जोडण्याचे काम करीत असतात.

surgical strike

भारतात मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक केवळ हेच पाहण्यासाठी येतात की, भारतीयांमध्ये अशी कोणती शक्ती आहे जी एका सशक्त राष्ट्राची निर्मिती करते. तरुणांना आवाहन करताना डोवाल म्हणाले, “प्रत्येक तरुण देशाचा सैनिक आहे. याच भावनेने आम्हाला एका सशक्त भारताची निर्मिती करायची आहे.”

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था