पहाटेच्या अजानमुळे त्रास होतो… अजान भोंगेविरहितही होऊ शकते; अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरूंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र ; कायदेशीर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन


वृत्तसंस्था

प्रयागराज : सकाळी मशिदीमध्ये होणाऱ्या अजानविरोधात अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूंनी लेखी तक्रार केली आहे. कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी अजानमुळे सकाळी माझी झोपमोड होते अशी तक्रार करणारे पत्र प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांना तीन मार्च रोजी लिहिले आहे. आता या पत्रावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Ajaan can also be without loudspeaker Letter from the Vice Chancellor of Allahabad University to the District Collector

दुसरीकडे जिल्हाधिकारी भानु चंद्र गोस्वामी यांनी नियमांनुसार यासंदर्भात करावाई केली जाईल असे म्हटले आहे. ही बातमी न्यूज १८ ने दिली आहे. यापूर्वी लोकप्रिय गायक सोनू निगमनेही अजानसंदर्भात तक्रार करताना झोप मोड असल्याचे म्हटले होते. त्यावरुनही दीड वर्षापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता.



– पहाटे पाच वाजता होते अजान

श्रीवास्तव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये रोज पहाटे साडेपाच वाजता मशिदीमध्ये अजान होते. एवढ्या पहाटे होणाऱ्या अजानच्या आवाजमध्ये झोपमोड होते. झोपमोड झाल्यानंतर मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला तरी मला पुन्हा झोप लागत नाही. अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर डोकेदुखीचा त्रास होत असल्याने याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

या पत्रामध्ये श्रीवास्तव यांनी एका म्हणीचाही वापर केलाय. Your freedom ends where my nose begins ही इंग्रजीमधील प्रसिद्ध म्हण श्रीवास्तव यांनी आपल्या पत्रात वापरली आहे. समाजात राहताना वेगवेगळ्या पंथाचे लोक एकमेकांवर कसे संस्कृतिक आक्रमण करतात यासंदर्भात ही म्हण अनेकदा वापरली जाते. त्याचाच संदर्भ कुलगुरूंनी दिला आहे.

श्रीवास्तव यांनी हे पत्र एका विशिष्ट संप्रदाय, जाती किंवा वर्गाविरोधात नसल्याचे स्पष्ट केले. ते आपली अजान भोग्यांचा वापर न करताही करू शकतात. असे केल्याने इतरांचा दिनक्रम बाधित होणार नाही, असेही श्रीवास्तव यांनी पत्रात नमूद केले आहे.

– अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही उल्लेख

ईदच्या आधी तर पहाटे चार वाजताच या भोंग्यातून घोषणा केली जाई. यामुळे सुद्धा मला आणि इतरांना त्रास सहन करावा लागणार आहे. भारतीय संविधानानुसार सर्व वर्गातील लोकांनी पंथनिरपेक्ष आणि शांततापूर्ण मार्गाने रहावे असे म्हटल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पत्रात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही उल्लेख करण्यात आलाय. २०२० साली करण्यात आलेल्या जनहितयाचिका क्रमांक ५७० चा उल्लेख या पत्रात आहे.

– पोलीस अधिकाऱ्यांना पाठवली पत्राची प्रत

श्रीवास्तव यांनी या पत्राची एक प्रत पोलीस आय़ुक्त, पोलीस महानिरिक्षक, पोलीस उप महानिरिक्षकांनाही पाठवली आहे. पोलीस उप महानिरिक्षक सर्वश्रेष्ठ त्रिपाठी यांनी काही दिवसांपूर्वी मला एक पत्र मिळाले असून या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यास सांगण्यात आल्याचं त्रिपाठी म्हणालेत. जिल्हाधिकाऱ्यांनाही कायदेशीर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.

Ajaan can also be without loudspeaker Letter from the Vice Chancellor of Allahabad University to the District Collector

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था