ब्रिटनहून 246 प्रवासी विमानाने भारतात, नव्या कोरोनाचा धोका: सरकारचा आगीशी खेळ सुरू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली  : कोरोनाचा नवा विषाणू ब्रिटनमध्ये थैमान घालत आहे. असे असताना ब्रिटनमधून 246 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं एक विमान नवी दिल्लीत दाखल झाले आहे. असेच एक विमान पुणे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव नसताना कुवेतहून आल्यानंतर पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढले होते. हे ज्वलंत उदाहरण समोर असताना ब्रिटनमधून प्रवासी आणून सरकार आगीशी का खेळत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. Air-india-flight-with-246-from-uk-lands-in-delhi-amid-new-strain-worry-sgy

भारताने यापूर्वी सुरक्षेच्या कारणावरून ब्रिटनची विमानसेवा २३ डिसेंबरला बंद केली होती. पण, सेवा नुकतीच सुरु झाली आहे.

भारतात सध्या कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेले ८२ रुग्ण आहेत. त्यातच बुधवारी भारताने पुन्हा विमानसेवा सुरु केली. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक आठवड्याला ३० विमानांचं उड्डाण होणार आहे.

air-india-flight-with-246-from-uk-lands-in-delhi-amid-new-strain-worry-sgy

यामध्ये भारतातून १५ आणि ब्रिटनमधून १५ उड्डाणं असतील. २३ जानेवारीपर्यंत अशाच पद्धतीने सेवा सुरु राहील अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी दिली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*