शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व, जळगावातही सत्तेसाठी एमआयएमची साथ, तीन नगरसेवक निलंबित

सत्तेसाठी काहीही करण्याचा पॅटर्न शिवसेनेनेजळगावातही सुरू ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने महापूर उपमहापौर निवडणुकीत एमआयएम नगरसेवकांची साथ घेतली. मात्र याचा फटका या नगरसेवकांना बसला असून त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. AIMIM there corporators from Jalgaon suspended for supporting Shivsena


विशेष प्रतिनिधी

जळगाव : सत्तेसाठी काहीही करण्याचा पॅटर्न शिवसेनेनेजळगावातही सुरू ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने महापूर उपमहापौर निवडणुकीत एमआयएम नगरसेवकांची साथ घेतली. मात्र याचा फटका या नगरसेवकांना बसला असून त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे.

जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी १८ मार्चला निवडणूक पार पडली. इतिहासात पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. मात्र यासाठी शिवसेनेने एमआयएमची मदत घेतली आहे. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेना पाठींबा दिल्याचं उघड झाले आहे. याबाबत, गुलाबराव पाटील यांनी देखील दुजोरा दिला आहे. जळगाव महापालिकेत एमआयएमचे एकूण तीन नगरसेवक आहेत. या तीनही नगरसेवकांनी शिवसेनेला पाठींबा दिल्यामुळे शिवसेनेच्या या विजयात एमआयएमचा देखील वाटा असल्याचं समोर आलं आहे.महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यास मदत केल्याने या नगरसेवकांवर एमआयएम पक्षाने मात्र कठोर कारवाई केली आहे. एमआयएमच्या तीन नगरसेवकांसह जळगावच्या जिल्हाध्यक्षांना पक्षाने निलंबित केले आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून या तीन नगरसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. तर, २१ मार्च दुपारी २ वाजेपर्यंत प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या कार्यालयात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेशही एमआयएम प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी दिले आहेत.

शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. कट्टर मुस्लिम विचारधारा असलेल्या एमआयएमवर शिवसेना टीका करत असते. मात्र याच एमआयएमशी सत्तेसाठी आघाडी शिवसेनेने केली. अमरावती महापालिकेतही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व पुन्हा एकदा समोर आल्याची टीका होत आहे.

AIMIM there corporators from Jalgaon suspended for supporting Shivsena

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*