आंदोलनाचा पवित्र हेतूच नष्ट झाल्याने तोडगा निघू शकत नाही, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा शेतकऱ्यांना इशारा


काही शक्तींना आपल्या व्यक्तीगत आणि राजकीय हेतूसाठी आंदोलन सुरू ठेवायचे आहे. आंदोलनाचा पवित्र हेतू नष्ट होतो, तेव्हा तोडगा निघू शकत नाही. कृषी कायद्यांच्या स्थगितीचा सशर्त प्रस्ताव मान्य असेल तरच पुढील बैठक घेण्यात येईल, असा इशारा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी नेत्यांना दिला.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काही शक्तींना आपल्या व्यक्तीगत आणि राजकीय हेतूसाठी आंदोलन सुरू ठेवायचे आहे. आंदोलनाचा पवित्र हेतू नष्ट होतो, तेव्हा तोडगा निघू शकत नाही. कृषी कायद्यांच्या स्थगितीचा सशर्त प्रस्ताव मान्य असेल तरच पुढील बैठक घेण्यात येईल, असा इशारा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी नेत्यांना दिला. Agriculture Minister Narendra Singh Tomar warned farmers that a solution could not be found as the sacred purpose of the agitation was destroyed

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील चर्चेची दहावी फेरीही निष्फळ ठरली. याबाबत बोलताना तोमर म्हणाले की, आम्ही आतापर्यंत केलेले प्रस्ताव हे शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत. आम्ही आता यापेक्षा अधिक चांगले काही करू शकत नाही. तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. आपली भेट पुन्हा होईल. पण पुढील तारीख निश्चित केलेली नाही.शेतकरी आंदोलन सुरूच रहावं यासाठी काही छुपे प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच सरकार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत कुठलाही निर्णय होत नाही. तरीही शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या हितासाठी आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा संघटनांनी विचार करावा. आपला निर्णय शेतकरी संघटनांनी शनिवारपर्यंत द्यावा. आजची बैठक निष्फळ ठरली. कारण शेतकऱ्यांचा हिताचा विचार नेत्यांच्या हृदयात नाहीत. यामुळे खेद वाटतो, असे तोमर म्हणाले. शेतकरी संघटना कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. पण सरकार त्यांच्याकडे याशिवाय पर्याय सादर करण्यास सांगत आहे.

केंद्राने पर्याय देऊनही ते फक्त कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. कायद्यांना वर्ष-दीड वर्षे स्थगिती देऊन समितीद्वारे सविस्तर चर्चा करण्याचा प्रस्ताव अत्यंत योग्य असून त्यावर संघटनांनी गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन तोमर यांनी केले.
कायद्यांना स्थगिती देण्याचा केंद्राचा प्रस्ताव अमान्य असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने केंद्रीय मंत्र्यांना बैठकीत सांगितले.

सिंघू सीमेवर गुरुवारी पंजाबमधील शेतकरी नेत्यांच्या बैठकीत केंद्राचा प्रस्ताव स्वीकारण्याबाबत दुमत होते. १७ नेते विरोधात तर, १५ नेत्यांचा कल प्रस्ताव स्वीकारण्याकडे होता. संयुक्त किसान मोर्चामधील बहुतांश नेत्यांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळावा, असे मत व्यक्त केले. प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची जय्यत तयारीही झाली आहे मग, आंदोलनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर केंद्राचा प्रस्ताव कशासाठी स्वीकारायचा, असे काही शेतकरी नेत्यांचे म्हणणे होते.

Agriculture Minister Narendra Singh Tomar warned farmers that a solution could not be found as the sacred purpose of the agitation was destroyed

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी