कृषी कायदे रद्द होणार नाही, अन्य पर्याय असतील तर त्यावर विचार करू, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ठणकावले


तिन्ही कृषी कायदे रद्द होणार नाहीत. त्या व्यतिरिक्त इतर पर्याय असतील तर द्या, त्यावर विचार करू, अशा शब्दांत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आंदोलकांना ठणकावून सांगितले आहे. Agriculture laws will not be repealed. If there are other options, we will consider them, Agriculture Minister Narendra Singh Tomar said


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तिन्ही कृषी कायदे रद्द होणार नाहीत. त्या व्यतिरिक्त इतर पर्याय असतील तर द्या, त्यावर विचार करू, अशा शब्दांत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आंदोलकांना ठणकावून सांगितले आहे.

केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कथित प्रतिनिधींनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी लावून धरली. मात्र, केंद्र सरकारने या मागण्या धुडकावून लावल्याच्. या बैठकीनंतर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या व्यतिरिक्त शेतकरी संघटनांनी दुसरा पर्याय द्यावा. त्यावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण तिन्ही कायदे रद्द करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले.तोमर म्हणाले, येत्या 15 जानेवारी रोजी नववी बैठक होणार आहे. त्यात तोडगा काढण्यात आम्ही यशस्वी होऊ. 15 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. बाबा लख्खा सिंग हे शीख समाजाचे धर्मगुरू आहेत. त्यांच्याशीही मी चर्चा केली आहे. शेतकरी संघटनांसोबत चर्चा करताना आलेल्या अडचणी लख्खा सिंग यांना सांगितल्या आहेत. शेतकरी नेत्यांशी तुम्ही स्वत: चर्चा करा. शेतकरी नेत्यांकडे कायदे रद्द करण्याशिवाय दुसरा काही पर्याय असेल तर आम्ही चर्चा करू, असंही लख्खा सिंग यांना सांगितले आहे.

Agriculture laws will not be repealed. If there are other options, we will consider them, Agriculture Minister Narendra Singh Tomar said

कृषी कायद्यांचे समर्थन करणाऱ्या संघटनांना बैठकीत समाविष्ट करून घेणार का? असा सवाल तोमर यांना विचारला असता त्याबाबतचा सध्या कोणताच विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या आम्ही आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत आहोत. परंतु, गरज पडल्यास कृषी कायद्यांना समर्थन करणाऱ्या संघटनांशी चर्चा करण्याचाही विचार करू, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था