After the anger of Devendra Fadnavis, the government felt ashamed and filed a case against Sharjeel Usmani

देवेंद्र फडणवीस यांच्या संतापानंतर सरकारला वाटली लाज, शरजील उस्मानीवर गुन्हा दाखल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत सरकारला लाज वाटत नाही का? असा सवाल केल्यावर खरोखरच सरकारला लाज वाटली. हिंदू धर्म सडलेला आहे, असे म्हणणाऱ्या शरजील उस्मानीवर रात्री उशिरा पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. After the anger of Devendra Fadnavis, the government felt ashamed and filed a case against Sharjeel Usmani


विशेष प्रतिनिधी

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत सरकारला लाज वाटत नाही का? असा सवाल केल्यावर खरोखरच सरकारला लाज वाटली. हिंदू धर्म सडलेला आहे, असे म्हणणाऱ्या शरजील उस्मानीवर रात्री उशिरा पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे 30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता उस्मानी याने प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्वारगेट पोलिसांकडे केली होती.पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना याबाबत एक पत्र लिहिलं होतं.

फडणवीस यांनी म्हटले होते की, उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारं, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधानं केली आहेत. आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो, अशाप्रकारची ही गंभीर विधाने आहेत.

एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली होती.

After the anger of Devendra Fadnavis, the government felt ashamed and filed a case against Sharjeel Usmani

शरजील नावाच्या काट्यार्ला अटक किंवा चौकशी होणार नसेल तर त्याला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही याची जबाबदारी आमची. एल्गार काय असतो दाखवुन देऊ, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

After the anger of Devendra Fadnavis, the government felt ashamed and filed a case against Sharjeel Usmani

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*