संजय राठोडांनंतर आणखी दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागणार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा

पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला, आता मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण व पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेवरुन राज्य मंत्रिमंडळातील आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अकेला आहे.After Sanjay Rathore, two more ministers will have to resign, claims BJP state president Chandrakant Patil


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला, आता मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण व पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेवरुन राज्य मंत्रिमंडळातील आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अकेला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाही. कोणत्याच खात्याचा कारभार धडपणे चाललेला नाही. त्यामुळे आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होणार हे निश्चित आहे.पोलिस अधिकारी सचिन वाजे प्रकरणाची मूळं लांबपर्यंत गेली आहेत. सरकार तुमचं असतानाही खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण दाबले जाते असा आरोप नाना पटोले कसं काय करत आहेत, असा सवाल पाटील यांनी केला.

पाटील म्हणाले, अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाचा अवमान करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयात लवकर निर्णय लागावा यासाठी सरकारकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. एमपीएससी परीक्षा आणि नोकर भरती लांबणीवर पडल्यामुळे त्याचा मराठा समाजावर परिणाम होत असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

त्यामुळे मराठा समाजाला विश्वासात घेऊन भरती सुरू करू असे समजावून सांगितले पाहिजे. साष्ट पिंपळगावमध्ये सुरू असणारं मराठा आंदोलन चिरडण्याचा निषेध करत जर आंदोलन जबरदस्तीने संपवायचा प्रयत्न झाला तर ते आणखी मोठे आंदोलन होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालांवर दररोज टीका करणारे असे राज्यकर्ते पाहिले नाही. पवार यांनी इतिहासात असे राज्यपाल पाहिले नाही, असे म्हटले होते. त्याला पाटील यांनी उत्तर दिले आहे.

After Sanjay Rathore, two more ministers will have to resign, claims BJP state president Chandrakant Patil

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*