कलम ३७० रद्द केल्यानंतर दगडफेकीच्या घटनांमध्ये ९० टक्क्यांनी घट

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये २०२० या वर्षात दगडफेक होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जवळपास ९० टक्के इतकी घट झाली असल्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले आहे. after removing article 370, stone pleanting in kashmir reduced 90%, says DGP dilbaugh singh

२०१९ मध्ये दगडफेकीच्या २५५ घटना घडल्या होत्या त्या तुलनेत २०२० मध्ये ८७.१३ टक्क्यांनी घट झाली आहे.पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी पुढे सांगीतले की, २०१८ मध्ये राज्यात दगडफेक करण्याच्या १४५८ तर २०१९ मध्ये १४१२ घटना घडल्या होत्या, त्यापैकी जास्त घटना केंद्राने त्यावर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीर राज्याचे विशेष दर्जा रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर घडल्या.

after removing article 370, stone pleanting in kashmir reduced 90%, says DGP dilbaugh singh

डीजीपी म्हणाले की,२०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये दगडफेकीच्या २५५ घटना घडल्या असून त्यात ८७.१३ टक्के घट झाली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*