माहिती मिळाल्यावर अनिल देशमुखांवर कारवाई का केली नाही, नारायण राणे यांची मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सचिन वाझे यांना मर्डर केसमध्ये वाचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली होती. मग मुख्यमंत्र्यांनी ती माहिती मिळताच अनिल देशमुखांवर कारवाई का नाही केली? असा सवाल करत भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.After receiving the information, why no action was taken against Anil Deshmukh says Narayan Rane

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी सहायक पोलीस सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंग यांनी केलाय.या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यावर राणे म्हणाले, हे भयावह आहे, पोलीस आयुक्त झालेले अधिकारी, महासंचालक स्थरावरचा अधिकारी, गृहमंत्र्यांचं नाव घेऊन सांगतो, तो सरळसरळ गृहमंत्र्यांवर आरोप करतोय. गृहमंत्र्यांनी सांगितलेलं काम सचिन वाझे करत होते.

सचिन वाझे यांना मर्डर केसमध्ये वाचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली होती. मग मुख्यमंत्र्यांनी ती माहिती मिळताच अनिल देशमुखांवर कारवाई का नाही केली? त्यांना मुख्यमंत्र्यांनी का निलंबित केलं नाही?

मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, याचा अर्थ या शंभर कोटी खंडणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही संबंध आहे. वाझेंना वाचवायचंही काम मुख्यमंत्री करतात. मुख्यमंत्र्यांचा सर्व घटनांशी डायरेक्ट संबंध आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा देणं आवश्यक आहे, अशी भूमिका राणे यांनी मांडली.

राणे म्हणाले, महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढतोय. कायदा आणि सुव्यवस्था नाही. विकास ठप्प झालाय. पोलीसच गुन्हे करु लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.

After receiving the information, why no action was taken against Anil Deshmukh says Narayan Rane

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*