मोदीनंतर पंतप्रधानपदासाठी योगींनाच जनतेची पसंती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारस कोण याची अनेकदा चर्चा होते. परंतु, देशातील सर्वाधिक मोठे राज्य आणि सर्वात जास्त खासदार पाठविलेल्या उत्तर प्रदेशातील जनतेने याचे उत्तर दिले आहे. मोदींनंतर योगी आदित्यनाथ यांनाच पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे.After Modi, the people prefer Yogi for the post of Prime Minister


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारस कोण याची अनेकदा चर्चा होते. परंतु, देशातील सर्वाधिक मोठे राज्य आणि सर्वात जास्त खासदार पाठविलेल्या उत्तर प्रदेशातील जनतेने याचे उत्तर दिले आहे. मोदींनंतर योगी आदित्यनाथ यांनाच पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यू आणि सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्याच नावाला निर्विवाद पसंती मिळाली आहे. २०१७ पेक्षाही मोठ्या बहुमताने ते निवडून येणार असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.मात्र, उत्तर प्रदेशातील जनतेला मोदींनंतर पंतप्रधानपदासाठी कोणास पसंती हे विचारले असता योगी आदित्यनाथ यांच्या नावावर पसंती देण्यात आली आहे. सर्वेक्षणातील ५० टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ मोदींनंतर पंतप्रधान व्हावेत असे म्हटले आहे.

३७ टक्के लोकांनी त्याला विरोध करत योगी सक्षम नसल्याचे म्हटले आहे. तर १३ टक्के लोकांनी याबाबत काहीही सांगता येणार नाही असे म्हटले आहे. या ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशात आज निवडणुका झाल्यास भाजपाला ४१ टक्के, समाजवादी पक्षाला २४ टक्के, बसपाला २१ टक्के मते मिळतील.

काँग्रेसला केवळ ६ टक्के मतांवर समाधान मानावे लागू शकते. मतांच्या टक्केवारीचे जागांमध्ये रूपांतर केल्यास भाजपाला २८४ ते २९४, समाजवादील पक्षाला ५४ ते ६४, बसपाला ३३ ते ४३ आणि काँग्रेसला १ ते ७ जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांच्या खात्यात १० ते १६ जागा जातील. या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागांमधील १५ हजार ७४७ लोकांचे मत जाणून घेण्यात आले.

After Modi, the people prefer Yogi for the post of Prime Minister

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*