खाद्यतेलांसह दुधात भेसळ केल्यास खबरदार, कठोर कारवाई करा ; राज्यमंत्री यड्रावकर यांचे आदेश

वृत्तसंस्था

मुंबई :  खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. भेसळी विरोधात अन्न व औषध विभागाची मोहीम अधिक तीव्र केली जाईल. भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.adulterated milk with edible oils Take drastic action Order of Minister of State Yadravkar

राज्यात खाद्य तेलांमध्ये भेसळ होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  त्यावेळी ते बोलत होते.खाद्य तेलातील भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी असे आदेश दिले. भेसळ करणारी दुकाने, कंपन्या, आस्थापनावर छापे टाकून कडक कारवाई करावी. तसेच खाद्य तेलात भेसळ करणाऱ्यांचे अन्न परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले.

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण या विभागांचा आढावा त्यांनी घेतला. खाद्य तेलाबरोबरच प्रतिबंधित अन्न पदार्थ, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी.

या माध्यमातून जनतेच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. या कारवायांबाबतचा अहवाल 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

adulterated milk with edible oils Take drastic action Order of Minister of State Yadravkar

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*