आदित्य ठाकरेंनी युवा सेनेतही आणली घराणेशाही, कार्यकारिणीत नेत्यांचीच मुले असल्याने कार्यकर्त्यांत संताप


आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकारिणीत नेत्यांच्याच मुलांना स्थान दिल्याने कार्यकर्त्यांत संताप निर्माण झाला आहे. युवा सेना ही उत्तराधिकारी सेना बनल्याची टिका करण्यात येत आहे. Aditya Thackeray brought dynasticism in Sena’s youth wing too, anger in the Shiv Sainiks


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकारिणीत नेत्यांच्याच मुलांना स्थान दिल्याने कार्यकर्त्यांत संताप निर्माण झाला आहे. युवा सेना ही उत्तराधिकारी सेना बनल्याची टिका करण्यात येत आहे.

मराठवाड्यातील युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच करण्यात आल्या. यामध्ये सर्व संघटनेतील लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकाऱ्यांचे चिरंजीव, नातेवाईक आहेत. निवड झालेल्यांची यादी शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे.आंदोलने करण्यासाठी आम्ही आणि पदांचे वाटप होते तेव्हा नेत्यांची पोरं का? असा सवाल सोशल मीडियात कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.

भारतीय जनता पक्षामध्ये नेत्यांच्या मुलांना बाजुला ठेवले जाते. यासाठी राष्ट्रीय पातळीवर धोरण आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीलाही नगरसेवकपदाचे तिकिट मिळत नाही. मात्र, युवा सेनेत केवळ नेत्यांच्या मुलांना संधी मिळते. उत्तराधिकारी तयार करण्यासाठी तर ही सेना काढली नाही ना, अशा शब्दांत कार्यकर्ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

Aditya Thackeray brought dynasticism in Sena’s youth wing too, anger in the Shiv Sainiks

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी