भाजपमध्ये आऊटगोइंगला ममतांचे नव्या इनकमिंनगे प्रत्युत्तर; टीव्ही अभिनेते, संगीतकारांना तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसला फोडून भाजपने तृणमूळमधल्या आऊटगोइंगला जे प्रोत्साहन दिले आहे, त्याला नवे इनकमिंग सुरू करून ममता बॅनर्जी यांनी प्रथमच प्रत्युत्तर दिले आहे.Actors Deepankar De, Bharat Kaul & Lovely Maitra, and Musician Shaona Khan joined Trinamool Congress

बंगालमध्ये स्क्रीन अभिनेते दीपांकर डे, भरत कौल आणि लव्हली मित्रा यांना ममतांनी तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन भाजपला प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे. भाजपने आत्तापर्यंत तृणमूळचे ११ आमदार आणि मंत्री फोडून पक्षात घेतले आहेत. आणखी अनेक आमदार आणि मंत्री भाजपमध्ये येण्याच्या रांगेत असल्याचे बोलले जात आहे.याच पार्श्वभूमीवर ममतांनी राज्यात आपला राजकीय प्रभाव कायम असल्याचे दाखवून देण्यासाठी तृणमूळ काँग्रेसचे दरवाजे नवोदितांना उघडले आहेत. फारशी राजकीय बॅकग्राऊंड नसलेल्या सेलिब्रिटींना प्रवेश देण्याची रणनीती ममतांनी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जींनी ठरविली आहे. त्यातूनच दीपांतक डे, भरत कौल, लव्हली मित्रा आणि संगीतकार सोहाना खान यांना तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.

या चौघांचीही आधीची राजकीय बॅकग्राऊंड कोणतीही नसल्याचा फायदा घेण्याचा ममतांचा मनसूबा आहे. राज्याचे मंत्री व्रतकुमार बसू यांच्या उपस्थितीत वर उल्लेख केलेल्या सेलिब्रिटींनी तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Actors Deepankar De, Bharat Kaul & Lovely Maitra, and Musician Shaona Khan joined Trinamool Congress

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*