तमिळनाडूत महिलांना भिक्षा नव्हे उत्पन्न देण्याची अभिनेते कमल हासन यांची जाहीरनाम्यात ग्वाही

विशेष प्रतिनिधी

कोइमतूर : मक्कल निधी मय्यमचे (एमआयएम) प्रमुख आणि अभिनेता कमल हासन यांनी पक्षाचा जाहीरनामा शुक्रवारी प्रसिद्ध केला. त्यात कौशल्यविकास आणि वृद्धीद्वारे महिलांना दरमहा दहा हजार ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्याची योजना आहे, जी भिक्षा नसेल असे त्यांनी म्हटले आहे.Actor Kamal Haasan testifies in a manifesto that women in Tamil Nadu are given income,

तमिळनाडूतील इतर प्रमुख पक्षांनी महिला कुटुंबप्रमुखांना साहाय्य म्हणून रक्कम जाहीर केली आहे. यात सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि मुख्य विरोधी पक्ष द्रमुक यांचा समावेश आहे. ही रक्कम एक हजार ते पंधराशे रुपयांच्या घरात आहे.या पार्श्वभूमीवर कमल हासन यांनी गृहिणींना केलेल्या कामाचा मोबदला देण्याची घोषणा गेल्या डिसेंबरमध्येच केली होती. त्यादृष्टिने त्यांनी जाहीरनाम्यात कार्यवाही केली आहे.

जाहीरनाम्यातील अन्य वैशिष्ट्ये

  • रस्ते वाहतूक महामंडळात कर्मचाऱ्यांना भागधारक बनविणार, जेणेकरून ते नफ्यात येईल
  • सर्व २३४ मतदारसंघांमध्ये स्वयंपूर्ण खेड्यांची निर्मिती
  • सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना मदत
  • कच्च्या मालाचा पुरवठा

Actor Kamal Haasan testifies in a manifesto that women in Tamil Nadu are given income

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*