राजीव गांधींच्या काळात काँग्रेसमध्ये गेलेले “राम” अरूण गोविल मोदींच्या काळात भाजपमध्ये आले!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात काँग्रेसचा प्रचार करणारे रामायणातले “राम” अरूण गोविल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत. रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी प्रवेश केला आहे. अद्याप भाजपाकडून त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार, याविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. Actor Arun Govil, best known for playing lord Ram in Ramayan TV series, joins Bharatiya Janata Party (BJP) in Delhi.

मात्र, आगामी ५ राज्यांमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरुण गोविल यांचा भाजपा प्रवेश झाल्यामुळे निवडणुकांच्या प्रचारात ते उतरू शकतात, असे मानण्यात येत आहे. नुकतेच अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला असून पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या प्रचारसभांमधून मिथुन चक्रवर्ती ममता बॅनर्जी आणि डाव्या पक्षांवर जोरदार टीका करत आहेत.

राम विरुद्ध रावण आणि सीता

रामानंद सागर यांची रामायण मालिका आणि अरूण गोविल यांची रामाची भूमिका १९९० च्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर होती. त्यावेळी १९८९ च्या निवडणूकीत ते रामाच्या वेशात काँग्रेसच्या व्यासपीठांवर दिसायचे. पण त्यावेळची राजकीय गंमत अशी होती, की रामायणात रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी आणि सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका हे भाजपचा प्रचार करीत होते. ते दोघेही राम रथयात्रेच्या लाटेत गुजरातमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभेत निवडूनही गेले होते.

Actor Arun Govil, best known for playing lord Ram in Ramayan TV series, joins Bharatiya Janata Party (BJP) in Delhi.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*