कांग्रेसमध्ये असलेल्या पत्नीविरुद्ध वापरलेल्या अभद्र भाषेमुळे प्रवक्त्याने ठोकला समाजवादी पक्षाला रामराम

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशच्या राजकारणात एका पोस्टमुळे सध्या खळबळ उडाली आहे. समाजवादी पक्ष सोडून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या पंखुरी पाठक यांच्या पोस्टमुळे राजकारणात तापले आहे. पत्नीवर सोशल मीडियावर केलेल्या अभद्र टिप्पणीमुळे निराश झालेले समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते अनिल यांनी पक्षच आता सोडला. पंखुरी पाठक या अनिल यादव यांच्या पत्नी आहेत. Activists slapped Samajwadi Party for abusing his wife

पंखुरीने एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टच्या एका भागात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिसत आहेत, तर दुसर्‍या भागात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव जौनपूर दौऱ्याचे चित्र असतानाचे दिसत आहेत.


समाजवादी पक्षाच्या मनात ते खासदाराच्या ओठावर, म्हणाले राम मंदिरासाठी देणगी जमविणाऱ्यांवर भाजपच दगडफेक करून घेईल


त्यासोबतच ‘समाजवाद विरुद्ध समाजवादाचा लिफाफा’ असे लिहिलेले होते. पंखुरी पाठक यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. पोस्ट शेअर केल्यामुळे समाजवादी पक्षाच्या समर्थक खवळले. ते पंखुरी पाठकांवर तुटून पडले आणि अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. पंखुडीनेही लखनौ पोलिसात अपमान करणाऱ्या लोकांविरूद्ध तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अपशब्द वापरणाऱ्यावर कारवाई सुरू केली. दुसरीकडे, पंखुरी पाठक यांचे पती अनिल यादव यांनीही यानंतर समाजवादी पार्टी सोडली. ते जवळपास दहा वर्षे समाजवादी पक्षाशी जोडले होते.

अनिल यादव यांनी पत्नीवरील टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी पक्ष सोडण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे अनिल यादव यांना समाजवादी पक्षाच्या सर्व अधिकृत व्हाट्सएप ग्रुपमधून काढून टाकले.

Activists slapped Samajwadi Party for abusing his wife

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*