गर्भपात सुधारणा कायदा २०२० मंजूर ; ५० वर्षे जुन्या कायद्यात सुधारणा; २४ आठवड्यांपर्यंत करता येणार गर्भपात

  • लोकसभेने हे विधेयक गेल्या वर्षीच मंजूर केले होते

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यसभेत गर्भपात सुधारणा कायदा २०२० मंजूर करण्यात आला आहे. विशिष्ठ परिस्थितीमध्ये गर्भपात करण्यासाठी कालमर्यादा २४ आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आली असल्याने बलात्कार पीडित, घरगुती लैंगिक अत्याचार, अल्पवयीन तसेच गतिमंद महिलांना या कायद्यातील सुधारणेमुळे दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय आराेग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी याबाबत राज्यसभेत झालेल्या चर्चेत माहिती दिली. Abortion up to 24 weeks in certain circumstances, Abortion Amendment Bill passed in Rajya Sabha

सभागृहात या विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणाले की, व्यापक विचारविनिमयानंतर हे विधेयक तयार करण्यात आले आहे. हे विधेयक प्रदीर्घ काळ प्रतीक्षा यादीवर होते आणि हे गेल्या वर्षी एकमताने लोकसभेत मंजूर झाले आहे.



त्यांनी सांगितले की,  हे विधेयक विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे. या मुद्द्यावर जगभरातील कायद्यांचा अभ्यास करण्यात आला हाेता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात मंत्रिगटाचीही स्थापना करण्यात आली हाेती. अस्तित्वात असलेल्या ५० वर्षे जुन्या कायद्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न या विधेयकातून करण्यात आला आहे.

बलात्कारासारख्या मुद्द्यातून महिलांसाेबत संवेदनशील व्यवहार केला पाहिजे. मात्र, विधेयकातील तरतुदींमुळे महिलांना न्याय मिळणार नाही, अशी भूमिका विराेधकांनी मांडली हाेती. गर्भपातासाठी वैद्यकीय मंडळाची परवानगी घेण्याचा मुद्दा याेग्य नसल्याचे मत सेनेच्या सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी मांडले हाेते.

Abortion up to 24 weeks in certain circumstances, Abortion Amendment Bill passed in Rajya Sabha

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*