आपचे नेते सोमनाथ भारती यांना जेलची हवा, म्हणाले अमेठीतील रुग्णालयांत ‘मुले नाही कुत्र्याची पिल्ले’ जन्मतात


आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांना अमेठीतील रुग्णालयाच्या स्थितीबाबत केलेले वक्तव्य चांगलेच भोवले आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यावर भारती यांच्यावर जेलची हवा खाण्याची वेळ आली आहे. अमेठीतील रुग्णालयांमध्ये ‘मुले नाहीत तर कुत्र्याची पिल्ले’ जन्मतात असे भारती म्हणाले होते. AAP leader Somnath Bharti wants jaila


वृत्तसंस्था

लखनऊ : आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांना अमेठीतील रुग्णालयाच्या स्थितीबाबत केलेले वक्तव्य चांगलेच भोवले आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यावर भारती यांच्यावर जेलची हवा खाण्याची वेळ आली आहे. अमेठीतील रुग्णालयांमध्ये ‘मुले नाहीत तर कुत्र्याची पिल्ले जन्मतात’ असे भारती म्हणाले होते.

सोमनाथ भारती यांनी नुकताच उत्तर प्रदेशाचा दौरा केला. या वेळी त्यांनी अमेठीतील काही रुग्णालये आणि शाळांची पाहणी केली. यावेळी भारती म्हणाले की, आम्ही केजरीवाल मॉडेल घेऊन आलो आहोत. उत्तर प्रदेशातील शाळा आणि रुग्णालयांची पाहणी करत आहोत. येथील रुग्णालयांची अवस्था अत्यंत वाईट आहे. येथील रुग्णालयांत मुले जन्मत नाहीत तर कुत्र्याची पिल्ले जन्म घेत आहेत.


कुत्र्याची पिल्ले आणि योगींची मौत; आपच्या आमदाराचा सुटला तोल


भारती यांच्या या घृणास्पद वक्तव्याविरोधात अमेठीतील नागरिक शोभनाथ साहू यांनी जगदीशपूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. अमेठी पोलीसांनी कलम ५०३/१५३ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर भारती यांना सुलतानपूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती पी. के. जयंत यांनी भारती यांचा अर्ज फेटाळून लावत १३ जानेवारीला सुनावणीची तारीख ठेवली. तोपर्यंत त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे.

AAP leader Somnath Bharti wants jaila

भारती यांच्यावर रायबरेलीमध्ये पोलीसांसोबत धक्काबुक्की आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अभद्र शब्दांत टीका केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था