नायब राज्यपालांना व्हॉईसरॉय बनविण्याचा केंद्राचा डाव, आप तसेच कॉंग्रेसने सरकारविरुद्ध थोपटले दंड

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  आपचे सर्व खासदार आमदार आणि नगरसेवकांनी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरवर निदर्शने केली.AAP and Congress demonstrates in Delhi against Modi govt.

लोकनियुक्त सरकारऐवजी नायब राज्यपालांकडे सर्व प्रशासकीय अधिकार सोपविण्याचा प्रस्ताव असलेल्या दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार दुरुस्ती विधेयकावरून आम आदमी पक्ष संतप्त झाला असून पक्षाने त्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्याला कॉंग्रेसचीही साथ मिंळाली आहे.केंद्राचा सर्वोच्च न्यायालयावर, राज्यघटनेवर विश्वास नाही, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. केजरीवाल म्हणाले, की आधी सर्व फायली नायब राज्यपालांकडे पाठवाव्या लागत होत्या. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लोकनियुक्त सरकारच्या अधिकारांचा दाखला देत नायब राज्यपालांकडे फायली पाठविण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते.

आता पुन्हा केंद्र सरकार या विधेयकाद्वारे सर्व फायली नायब राज्यपालांकडे पाठविण्यास सांगत आहे. आपचे खासदार संजय सिंह, सुशील गुप्ता, एन. डी. गुप्ता यांनीही संसद भवनाच्या आवारात गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करून विधेयकाला कडाडून विरोध केला.

दुसरीकडे यावरून काँग्रेसनेही निदर्शने केली. अशा प्रकारचे विधेयक पूर्णतः घटनाबाह्य असल्याची टिका काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम आणि माजी कायदा मंत्री कपील सिब्बल यांनी केली. हे विधेयक म्हणजे नायब राज्यपालांना व्हॉईसरॉय बनविण्याचा प्रयत्न असल्याचा टोला लगावताना काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचेही आवाहन केले आहे.

AAP and Congress demonstrates in Delhi against Modi govt.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*