बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ‘सामान्य अधिकारी स्केल – २’ पदाच्या एकूण १५० जागा ; अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ‘सामान्य अधिकारी स्केल – २’ पदाच्या एकूण १५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२१ आहे. A total of 150 posts of ‘General Officer Scale-2’ under Bank of Maharashtra

बँकेने नुकतीच अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र उमेदवारांना बँकेची वेबसाईट bankofmaharashtra.in च्या माध्यमातून पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २२ मार्चपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२१ आहे.पॅन इंडियावर आधारित जनरल ऑफिसर स्केल 2 साठी एकूण 150 रिक्त जागा उपलब्ध आहेत आणि निवडलेल्या उमेदवारांना बँकेच्या आवश्यकतेनुसार शाखा व्यवस्थापक/अधिकारी म्हणून भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल. शॉर्टलिस्टेड उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावण्यात येईल.

जनरल ऑफिसर स्केल २- १५० पद

कुणासाठी किती जागा

एससी – २२

एसटी – ११

ओबीसी – ४०

ईडब्लूएस – १५

यूआर – ६२

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

भरती प्रक्रिया : मुलाखत / चाचणी

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयात किमान ६० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण.

परीक्षा फी :

General/OBC: Rs. 1180/-
SC/ST: Rs.118/-
PWD/Femail: फी नाही

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

A total of 150 posts of ‘General Officer Scale-2’ under Bank of Maharashtra

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*