सिग्नल अँपच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ; WhatsApp ने अटी – शर्ती लादल्यावर यूजर्स नाराज


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने २०२१ च्या सुरुवातीला नव्या अटी आणि शर्ती आणल्याचा त्याला तोटाच झाल्याचे दिसत आहे. तर सिग्नल या अँपला त्याचा फायदा होतो आहे. A huge increase in the popularity of signal app WhatsApp

नवीन प्रायव्हसी पॉलिसी जर तुम्ही अमान्य केल्या तर अकाऊंट डिलीट करण्याचा इशारा यूजर्सना रूचलेला नाही. व्हॉट्सअ‍ॅपविरोधात युजर्समध्ये नाराजी असून याचा चांगलाच फायदा सिग्नल अ‍ॅपला होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवर सिग्नल अ‍ॅप वापरण्याचे आवाहन केले होतं. मस्क यांनी आपल्या 41.5 मिलियन फॉलोअर्सना सिग्नल वापरण्याचे आाहन केल्यापासून या अ‍ॅपच्या डाउनलोडमध्ये मोठी वाढ झाली. त्यानंतर भारतातील पेटीएम कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनीही भारतीयांना सिग्नल अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.


टिक टॉकवरील बंदीचे चीनवर दीर्घकालीन परिणाम


“भारतात व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक मक्तेदारीचा चुकीचा वापर करताहेत. लाखो युजर्सच्या खासगी व्यवहारात डोकावत आहेत. आता आपण सिग्नल अ‍ॅप वापरायला सुरूवात करायला हवी”, असे ट्विट विजय शेखर शर्मा यांनी केले आहे.

सिग्नल अ‍ॅपच्या लोकप्रियतेने अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सिग्नल अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅपवरही मात केली आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सच्या यादीत सिग्नल अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकून भारतातील अव्वल फ्री अ‍ॅप बनल्याची माहिती सिग्नल अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. भारताशिवाय जर्मनी, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँग काँग आणि स्विझर्लंड या देशांमध्येही सिग्नल टॉप डाउनलोड अ‍ॅप ठरलं आहे.

A huge increase in the popularity of signal app WhatsApp

सिग्नल अ‍ॅप तुमचा पर्सनल डेटा मागत नाही किंवा स्टोअरही करीत नाही. त्यामुळे हा डेटा कोणाला शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही. सिग्नलवर फक्त तुमचा फोन नंबर स्टोअर केला जातो. ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि जुने मेसेज आपोआप गायब होण्याचे फिचरही यामध्ये आहे. सिग्नलमध्ये ‘डेटा लिंक्ड टू यू’ हे फिचरही दिलं आहे. हे फिचर सुरू केल्यानंतर कोणीही चॅटिंग करताना चॅटचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. म्हणजे तुमची चॅटिंग पूर्णतः सुरक्षित राहते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती