देशभरातील शेतकऱ्यांना भारत बंद – चक्का जामचे आवाहन करून दिल्ली – यूपी गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी आंदोलकांचा फेर धरून डान्स

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांना भारत बंदचे आणि रस्ते – रेल्वे चक्का जाम करण्याचे आवाहन करून संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी आंदोलकांनी गाझीपूर बॉर्डरवर फेर धरून डान्स केला. A group of protesters sing and dance at Ghazipur border (Delhi-UP) during 12-hour ‘Bharat Bandh’ called by Samyukt Kisan Morcha against Centre’s Farm Laws

दिल्लीच्या वेशीवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलकांनी आज सकाळी ६.०० वाजल्यापासून भारत बंदची हाक दिली आहे. तिचा देशात नव्हे, पण सुरवातीच्या तासात दिल्लीच्या बॉर्डरवर परिणाम दिसला.सकाळीच शेतकऱ्यांनी गाझीपूर बॉर्डरवर राष्ट्रीय महामार्ग ९ रोखला. त्याचवेळी काही आंदोलकांनी रस्त्यावरच फेर धरून डान्स केला. संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी आंदोलक शेतकऱी दूध तसेच भाज्यांचा पुरवठाही रोखतील, असे सांगितले.

किसान मोर्चाने शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले असून बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारले आहेत. देशात अन्य शहरांमध्ये कुठे बंदचा परिणाम झाल्याच्या बातम्या नाहीत.

शेतकरी अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर उतरणार आहेत. भारत बंददरम्यान मार्केट तसेच वाहतूक सेवा बंद असेल, असे ज्येष्ठ शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवार यांनी सांगितले होते. तर दुसरीकडे देशातील आठ कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने आपण बंदमध्ये सहभागी नसून मार्केट सुरू राहतील असे स्पष्ट केले आहे.

A group of protesters sing and dance at Ghazipur border (Delhi-UP) during 12-hour ‘Bharat Bandh’ called by Samyukt Kisan Morcha against Centre’s Farm Laws

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*