पेट्रोलचे शतक, सोन्याची दोनशेने विकेट; आवक-पुरवठ्यात फरक; डॉलरच्या घसरगुंडीचा परिणाम


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरात एकीकडे डिझेल, पेट्रोल इंधनाचे दर वाढत असून सोने चांदीच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र दिसत आहे.

पेट्रोलच्या किमती आकाशाला भिडत आहेत. आता राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल प्रति लिटरमागे 100 रुपयेच्या घरात पोचले आहे. अनेक ठिकाणी ते 100 रुपये गाठण्याच्या तयारीत आहे. आखातात पेट्रोल उत्पादक कंपन्यांनी कोरोना संसर्गामुळे उत्पादन कमी केले असून निर्यातही कमी झाली आहे. आवक आणि पुरवठ्यात फरक पडल्याने इंधनाचे दर भडकत आहेत. A century of petrol, two hundred wickets at sea; Inward-event; Consequences of dollar depreciation

दुसरीकडे सराफी बाजार तेजीत असला तरी सोन्याचे भाव मात्र कमी होत चालल्याचे चित्र दिसत आहे. एक प्रमुख गुंतवणूक या दृष्टीने त्याकडे पाहिले जाते. कोरोनामुळे लग्न सोहळे पुढे ढकलले होते. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोन्याला मागणी नव्हती. परंतु, नंतर ती वाढल्याचे दिसतात सोन्याचे दरही वाढले होते. पण, त्यात नंतर घट होत गेली आहे.
मुंबईत 10 ग्रॅम सोन्याच्या दरात गुरुवारच्या तुलनेत 200 रुपयांची घसरण झाली. एक तोळा 48 हजार 800 रुपये झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या किमती घसरल्याने सोन्याचे दर कमी झाले आहेत.मुंबईतील सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47800 रुपये
24 कॅरेट सोने : 48,800 रुपये
चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)

पुणे सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47, 800 रुपये
24 कॅरेट सोने : 48, 800 रुपये
चांदीचे दर : 65900 रुपये (प्रतिकिलो)

नाशिक सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47800 रुपये
24 कॅरेट सोने : 48,800 रुपये
चांदीचे दर : 66000 रुपये (प्रतिकिलो)

नागपूर सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47, 800 रुपये
24 कॅरेट सोने : 48, 800 रुपये
चांदीचे दर : 66000 रुपये (प्रतिकिलो)


सोन्याला सध्याच्या एक किलो चांदीचा दर ?

सध्या 1 किलो चांदीचा दर 60 हजार रुपये आहे. काही दिवसानी एक तोळा सोन्याला 63 हजार रुपये मोजावे लागतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. म्हणजेच सोन्याचे दर कमी होत असले तरी ते वाढणारच आहेत.

A century of petrol, two hundred wickets at sea; Inward-event; Consequences of dollar depreciation

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती