भाजपा नेत्याच्या घरासमोर शेण ओतणाऱ्यांविरोधात खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

  • गुन्हा मागे घेण्याची शेतकरी संघटनेची मागणी

विशेष प्रतिनिधी

चंडीगड : कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाबमधील होशियारपूरमध्ये भाजपा नेत्याच्या घरासमोर शेणाने भरलेली ट्रॉली रिकामी करणाऱ्या आंदोलकांविरोधात पोलिसांनी थेट हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. A case of attempted murder has been registered against those who poured dung in front of the BJP leader house

शुक्रवारी घडलेल्या या प्रकरणानंतर आंदोलकांवर करवाई करण्याची मागणी ज्यांच्या घऱासमोर हा प्रकार घडला ते माजी मंत्री तीक्ष्ण सूद यांनी केली होती. या प्रकरणामध्ये होशियारपुर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी करण्यासाठी खास चार सदस्यांची टीमही तयार करण्यात आल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.भारती किसान युनियन राजेवालचे नेत्यांनी या प्रकरणामध्ये आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली आहे. तातडीने हे गुन्हे मागे घेतले नाही तर सात जानेवारी रोजी जालंदरमधील रस्त्यांवर उतरुन आंदोलन करू, सरकारने आमचं म्हणणे ऐकले नाही तर होशियारपूरमध्ये जसे मंत्र्याच्या घरासमोर शेण ओतले तसेच पुन्हा अनेक ठिकाणी पाहायला मिळेल, अशी धमकीही संघटनेने दिली आहे.

या प्रकरणामध्ये भाजपाचे जिल्हा सचिव सुरेंद्र पाल भट्टी यांनी तक्रार दाखल केली आहे. आपण एक जानेवारी रोजी सूद यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी जात असतानाच आंदोलकांनी ट्रॉलीमधून शेण आणून सूद यांच्या घरासमोर ओतले. त्यावेळी या आंदोलकांकडे हत्यारेही होती असेही भट्टी यांनी तक्रारीत म्हटले आहे. या आंदोलकांनी सूद यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही भट्टी यांनी केला. तसेच ट्रॅक्टर चालकाने सूद आणि त्यांच्या मित्रांवर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केल्याचंही भट्टी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

सिंघू येथे आंदोलन करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना कृषी कायद्याची काहीच माहिती नसून काही शेतकरी केवळ पिकनिक म्हणून तिथे जात असल्याचे वक्तव्य सूद यांनी केले होते.

कोणत्या कलमांखाली दाखल केलेत गुन्हे?
या प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांनी कलम ४५२ (बेकायदेशीररित्या घरात प्रवेश करणे), कलम ५०६ (गुन्हेगारी कृत्य) या गुन्ह्यांखाली तक्रा दाखल केल्याची माहिती होशियारपूरचे एसएसपी असणाऱ्या नवज्योत सिंह महाल यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली. मात्र एफआयआरच्या कॉपीमध्ये सहा कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं दिसून येत असून यामध्ये कलम ३०७ म्हणजेच हत्येचा प्रयत्न केल्याचं कलमही घरासमोर शेणाची ट्रॉली खाली करणाऱ्या आंदोलकांविरोधात लावण्यात आलं आहे. त्याचबरोबर कलम १४८ म्हणजेच दंगल घडवण्याचा गुन्हाही आंदोलकांवर दाखल करण्यात आलाय.

A case of attempted murder has been registered against those who poured dung in front of the BJP leader house

सूद यांनी केलं होतं आंदोलन
सूद यांच्या घरासमोर ट्रॉली खाली करताना आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर संतापलेल्या सूद यांनी आपल्या कार्यकर्त्यांसहीत राय बहादुर जोधमल रस्त्यावर धरणे आंदोलन केले होते. पंजाबमधील भाजपाचे प्रमुख अश्विनी कुमार यांनाही या प्रकरणासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी असल्याचे सांगत आलेल्या काही लोकांनी सूद यांच्या घरावर हल्ला केला, अशी टीका कुमार यांनी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*