गूढ वाढले; मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळला

प्रतिनिधी

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असताना अजून एक मोठी घडामोड घडली आहे.A Body Has Been Found At The Location In Reti Bunder Mumbra Where Mansukh Hirans Body Was Found

मुंब्रा रेतीबंदर जिथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता तिथेच अजून एक मृतदेह आढळला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी गूढ वाढले आहे.सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाची ओळख पटलेली असून शेख सलीम अब्दुल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ४८ वर्षीय शेख अब्दुल सलीम मजूर असून मुंब्रा, रेतीबंदर येथे वास्तव्यास होते.

घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस अधिकारी, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते.बचावकार्य पूर्ण करण्यात आले असून मृतदेह पोलिसांकडे सोपवण्यात आला असल्याचे आपत्ती विभाग आणि पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

A Body Has Been Found At The Location In Reti Bunder Mumbra Where Mansukh Hirans Body Was Found

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*