मुख्यमंत्र्यांच्या दुराग्रहामुळे शेतकऱ्यांचे तब्बल 9,660 कोटींचे नुकसान, केंद्राची योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूच दिली नाही

9,660 crore loss to farmers due to CM Mamata Banerjee stubbornness, Central Govt Scheme did not reached to West Bengal farmers

देशाच्या अन्नदात्याच्या आर्थिक प्रगतीसाठी मोदी सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनादेखील त्याचाच एक भाग आहे. मोदी सरकारने ही योजना सुरू करून तब्बल 25 महिने उलटले आहेत, परंतु ममतांच्या दुराग्रहामुळे पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना याचा अद्याप लाभच मिळालेला नाही. 9,660 crore loss to farmers due to CM Mamata Banerjee stubbornness, Central Govt Scheme did not reached to West Bengal farmers


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : देशाच्या अन्नदात्याच्या आर्थिक प्रगतीसाठी मोदी सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनादेखील त्याचाच एक भाग आहे. मोदी सरकारने ही योजना सुरू करून तब्बल 25 महिने उलटले आहेत, परंतु पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना याचा अद्याप लाभच मिळालेला नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोदीविरोध एवढा टोकाला गेलाय की, त्यांनी शेतकरी हिताची योजना राज्यात लागूच होऊ दिलेली नाही. ममता सरकारची शेतकऱ्यांचे भले व्हावे, ही इच्छा नाही का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या दुराग्रहामुळे बंगालच्या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा आढावा केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकताच घेतला आहे. यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या तब्बल 9 हजार 660 कोटी रुपयांपासून वंचित राहावे लागले आहे.शेतकरी हिताची योजना राजकीय युद्धाला बळी पडल्याचे यावरून दिसून येते. आता ही योजना लागू झाली तरीही ही रक्कम तेथील शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही. त्यांना फक्त पुढच्या हप्त्यांचा फायदा होईल. योजना सुरू झाल्यावर ती महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत लागू करण्यात आली होती. परंतु नंतर कृषी मंत्रालयाने योजनेच्या पोर्टलवर स्वयं-नोंदणीची सुविधा दिली. मग या योजनेपासून वंचित असलेल्या पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना थेट अर्ज करण्याची सुविधा मिळाली आहे. यानंतरच 24,41,130 शेतकऱ्यांनी स्वत: ऑनलाईन नोंदणी केली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना पोर्टलवरून ही माहिती मिळाली आहे. अर्ज असूनही त्या शेतकऱ्यांना तोपर्यंत पैसे मिळू शकणार नाहीत, जोपर्यंत ममता बॅनर्जी त्यांच्या राज्यात ही योजना लागू करत नाहीत. पश्चिम बंगाल हे देशातील एकमेव असे राज्य आहे जेथे या योजनेंतर्गत 69 लाख शेतकरी कुटुंबांना पीएम किसानचा एक रुपयाही मिळालेला नाही.

9,660 crore loss to farmers due to CM Mamata Banerjee stubbornness, Central Govt Scheme did not reached to West Bengal farmers

तथापि, इतर राज्यांतील 11.52 कोटी शेतकऱ्यांना 1 लाख 15 हजार कोटींची मदत मिळाली आहे. अन्नदात्यांचा हक्क हिरावणाऱ्या राज्य सरकारविरोधात आता भाजपने रणशिंग फुंकले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना मेनंतर पैसेही मिळतील, असे आश्वासन दिले आहे. कारण तोपर्यंत बंगालमध्ये भाजपचे सरकार असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा तापणार हे निश्चित!

9,660 crore loss to farmers due to CM Mamata Banerjee stubbornness, Central Govt Scheme did not reached to West Bengal farmers

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था