94th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ऋषींच्या तपोभूमीत विज्ञानमहर्षीचा सन्मान; अ. भा. मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रथमच वैज्ञानिक लेखक जयंत नारळीकर


विशेष प्रतिनिधी

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शताब्दीकडे वाटचाल करत असतानाच नाशिकच्या ऋषींच्या तपोभूमीत विज्ञानमहर्षीचा सन्मान करण्यात येतो आहे. अ. भा. मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची एकमताने निवड करण्यात येऊन प्रथमच एका वैज्ञानिक लेखकाला हा बहुमान देण्यात आला आहे. मराठीत विज्ञान लेखक अनेक आहेत. पण अवकाश संशोधन क्षेत्रात मूलभूत संशोधन करून सिध्दांत मांडणारे नारळीकर एकमेव आहेत. 94th akhil bhartiya marathi sahitya sammelan Scientist writer Jayant Narlikar for the first time as the President

नारळीकरांच्या नावाची अधिकृत घोषणा आज नाशिकमध्ये करण्यात आली. साहित्य महामंडळाचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिक ठाले पाटील यांनी याबाबत घोषणा केली. 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये 26, 27, 28 मार्चला होणार आहे. या साहित्य समंलेनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत होती, मात्र अखेर जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.नारळीकर यांच्या रुपाने पहिल्यांदाच वैज्ञानिक लेखकाला साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. साहित्य महामंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज जवळपास तीन तास पार पडलेल्या बैठकीत नारळीकरांच्या नावावर अखेर एकमत झाले. साहित्य मंडळ अध्यक्ष कौतिक ठाले पाटील, मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या सह इतर पदाधिकारी बैठकीला हजर होते.

अध्यक्षपदासाठी होती जोरदार रस्सीखेच होती. अध्यक्षपदासाठी ९ नावांची चर्चा होती. साहित्यिक भारत सासणे, जयंत नारळीकर, रामचंद्र देखणे, जनार्दन वाघमारे, तारा भवाळकर, अनिल अवचट, रवींद्र शोभणे, मनोहर शहाणे, गणेश देवी यांची नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. यापैकी नारळीकरांना हा मान देण्याचे निश्चित करण्यात आले.

94th akhil bhartiya marathi sahitya sammelan Scientist writer Jayant Narlikar for the first time as the President

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था