स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पर्यटकांसाठी आठ रेल्वेगाड्या सुरु, पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा


विशेष प्रतिनिधी 

केवडीया : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा केवडिया येथे उभारला आहे. तो पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी आठ रेल्वेगाड्या आज सुरु करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला. 8 trains were flaged off today from various destinations to kevdiya

स्वातंत्र्यानंतर विखुरलेल्या देशाला एका सूत्रात बांधण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. त्यांच्या कार्याला नमन करण्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात देशाच्या एकतेचे प्रतीक असलेला या पुतल्याचर मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले होते.

देशभरातील पर्यटकांना पुतळा पाहण्याचा आनंद लुटता यावा, यासाठी या 8 रेल्वेगाड्या थेट सुरु केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतातून प्रवासी आता स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाऊ शकतात. लोक दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, वाराणसी, उत्तर प्रदेशच्या प्रतापगड आणि मध्य प्रदेशच्या रीवा येथून ट्रेनमध्ये चढू शकतात.

स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे धावणाऱ्या गाड्या

 • ट्रेन क्रमांक 09103/ 04 केवडिया-वाराणसी महामना एक्स्प्रेस (साप्ताहिक)-
 • ट्रेन क्रमांक 02927/28 दादर-केवडिया एक्सप्रेस (दररोज), दादर सुटणार : 11.50 रात्री , केवडिया सुटणार रात्री 9.50 वाजता.
 • ट्रेन क्रमांक 09247/48 अहमदाबाद-केवडिया मार्गावरील जनशताब्दी एक्सप्रेस (दररोज),
 • ट्रेन क्रमांक 09145/46 निजामुद्दीन-केवडिया संपर्क क्रांती एक्सप्रेस (आठवड्यातून दोनदा).
 • ट्रेन क्रमांक 09105/06, केवडिया – रीवा एक्सप्रेस ( आठवड्यातून एकदा).
 • ट्रेन क्रमांक 09119 /20 चेन्नई – केवडिया एक्सप्रेस (आठवड्यातून एकदा)
 • ट्रेन क्रमांक 09107/8 प्रतापनगर-केवडिया मार्गावरील मेमू ट्रेन (दररोज)
  ट्रेन क्रमांक 09109/ 10 केवडिया-प्रतापनगर मार्गावरील मेमू ट्रेन (दररोज).
 • दिल्लीतील लोक हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन येथून ट्रेनमध्ये चढू शकतात. मुंबईचे प्रवासी भारतीय रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावरून स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाऊ शकतात.

8 trains were flaged off today from various destinations to kevdiya

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी