67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा:सुशांत सिंह राजपूतचा ‘छिछोरे’ ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, तर कंगना रनौतचा पुरस्कार ‘ चौकार ‘

  • सोमवारी 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात 2019 मध्ये रिलीज चित्रपटांना पुरस्कार देण्यात आला आहे. यात नितेश तिवारी दिग्दर्शीत आणि दिवंगत सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर अभिनीत ‘छिछोरे’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान मिळाला आहे. याशिवाय, अभिनेत्री कंगना रनौतला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कंगनाचा हा करिअरमधील चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

  • बी प्राक यांना केसरी चित्रपटाच्या ‘तेरी मिट्टी’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.तर भोसले चित्रपटासाठी मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार,धनुष यांना असुरान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे .

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 67व्या राष्ट्रीय चित्रपटांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनीत चित्रपट ‘छिछोरे’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला आहे. 67 th National Awards: Sushant Singh Rajput’s Chhichhore Wins Best Hindi Film – Full List Of Winners

दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये याची घोषणा करण्यात आली. या दरम्यान मल्याळम चित्रपट जल्लीकट्टूला सर्वोत्कृष्ट चित्रपटसृष्टीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

 

 

मल्याळम फिल्म ‘मार्ककारा: लायन ऑफ द अरेबियन सी’ या चित्रपटाला 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात सुपरस्टार मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत. त्याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टसाठीही पुरस्कार देण्यात आला. त्याच वेळी, महेश बाबू अभिनीत तेलगू चित्रपटातील महर्षी सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडले गेले.

 

67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : 

सर्वोत्कृष्ट अन्वेषक चित्रपट- ‘जक्कल (मराठी)’

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशन फिल्म : ‘राधा’

सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक – सोहिनी चट्टोपाध्याय

सिक्किमला ‘मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट अवॉर्ड’

सर्वोत्कृष्ट हरियाणवी चित्रपट- ‘छोरी छोरों से कम नहीं’

सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट- ‘रब दा रेडिओ २’

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- ‘बारडो’ BARDO

सिक्किमला ‘मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट अवॉर्ड’

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट-  ‘छिछोरे’

सर्वोत्कृष्ट चित्रपटलेखन: जल्लीकट्टू (मल्याळम)

सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक गाणे: बारडो (मराठी)

सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्व गायक: केसरी-तेरी मिट्टी (हिंदी) -बी प्रा

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: पल्लवी जोशी, ताशकंद फाईल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: विजय सेतुपति (तमिळ फिल्म-सुपर डिलक्स)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: कंगना रनौत (मणिकर्णिका, पंगा)

सर्वोत्कृष्ट अभिनेता: मनोज बाजपेयी (भोसले चित्रपटासाठी), धनुष (असुरान चित्रपटासाठी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : बहत्तर हूंरे

सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट: कस्तूरी (हिंदी)

 

मागच्या वर्षी कोरोनामुळे राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली नव्हती. आज जाहीर झालेले पुरस्कार एक वर्ष उशीराने घोषित होत आहे. हे पुरस्कार केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून जाहीर होत असतात. तसेच, या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाते.

67 th National Awards: Sushant Singh Rajput’s Chhichhore Wins Best Hindi Film – Full List Of Winners

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*