महाराष्ट्रातील नवीन महामार्गांसाठी केंद्राकडून ५८०१ कोटी, नितीन गडकरी यांंची माहिती

केंद्राने वार्षिक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्रासाठी 5,801 कोटी रुपयांच्या नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी 2,727 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी होती. तो वाढवून 5,801 कोटी रुपये केला आहे. यामुळे राज्यात 1035 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांच्चा विकास होईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 5801 crore from the Center for new highways in Maharashtra, information of Nitin Gadkari


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्राने वार्षिक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्रासाठी 5,801 कोटी रुपयांच्या नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी 2,727 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी होती. तो वाढवून 5,801 कोटी रुपये केला आहे. यामुळे राज्यात 1035 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांच्चा विकास होईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 5801 crore from the Center for new highways in Maharashtra, information of Nitin Gadkari

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महाराष्ट्रातील महामार्ग पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.


आसाममध्ये महामार्गाचे जाळे : गडकरी


याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, महामार्गांच्या विकासासाठी 3,037 कोटी रुपये खर्चासह 406 किमी लांबीच्या दोन पदरी मार्गाचा विकास समाविष्ट आहे. 5 प्रमुख पूल आणि 10 छोट्या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी 429 कोटी रुपयांचा समावेश आहे. केंद्रीय रस्ते निधी योजनेंतर्गत 1,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. कंटेनर वाहतूक सुलभ व्हावी यासाठी ग्रीनफील्ड दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग जेएनपीटी पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकार जीएसटी सूट आणि रॉयल्टी मुक्त स्टील आणि सिमेंटच्या पुरवठ्याच्या माध्यमातून या प्रकल्पात भागीदारी करेल, जी या प्रकल्पातील राज्य सरकारची मालकी मानली जाईल.
गडकरी म्हणाले की, केवळ रस्तेच बांधले जाणार नाहीत तर वृक्षारोपणही केले जाणार आहे. वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्याजातील. पंढरपूर – आळंदी आणि पंढरपूर-देहू रोडला जोडणारा पालखी मार्ग बांधला जाणार असून वारकऱ्यांसाठी पंढरपुरात सुरक्षित आणि आरामदायी तीर्थयात्रेसाठी समांतर पादचारी मार्ग असणार आहे.

5801 crore from the Center for new highways in Maharashtra, information of Nitin Gadkari

मुंबई-पुणे महामार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांत जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुरतहून नाशिक -नगर – सोलापूर मार्गे स्वतंत्र उत्तर-दक्षिण महामार्ग बांधला जाईल, असे सांगून गडकरी म्हणाले, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्रात 3,771 किलोमीटर काँक्रीटचे रस्ते बांधले आहेत. 2020-21 दरम्यान 2,500 किमी रस्ते बांधणीचे लक्ष्य असून त्यापैकी आतापर्यंत 1,394 किमीचे रस्ते पूर्ण झाले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*