बेकायदा संपत्तीतील 50 टक्के रक्कम जमा करा, सेबीचा प्रणव राय दांम्पत्याला दणका


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अंतर्गत शेअर घोटाळा करून बेकायदा जमा केलेल्या संपत्तीतील 50 टक्के रक्कम जमा करा, असा आदेश सेबीने एनडिटीव्हीचे प्रवर्तक प्रणव राय आणि त्यांची पत्नी राधिका राय यांना दिला आहे. 50 percent of illicit wealth Deposit the amount hit the SEBI Pranav Rai couple

प्रणव राय आणि त्यांची पत्नी राधिका राय यांनी एनडिटीव्हीच्या अंतर्गत शेअर खरेदी विक्रीत गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते. 16 कोटी 97 लाख रुपयांची रक्कम त्यांनी 12 वर्षांपूर्वी बेकायदा गोळा केल्याचे उघड झाले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये दोषी धरले होते व रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते.

तसेच शेअर बाजारात दोन वर्षे व्यवहार करण्यास बंदी घातली होती. आता त्यांना 50 टक्के रक्कम जमा करण्यासाठी सात आठवड्याची मुदत दिली आहे.

50 percent of illicit wealth Deposit the amount hit the SEBI Pranav Rai couple

एनडिटीव्हीची किंमतीची संपूर्ण माहिती असताना आणि महत्वाची पदे सांभाळत असताना शेअरमध्ये केलेला घोटाळा अयोग्य आहे , असा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. राय दांपत्यासह एनडिटीव्हीचे माजी सीईओ विक्रमादित्य चंद्रा, वरिष्ठ सल्लागार इश्वरी वाजपेयी, ग्रुप सिफओ सौरभ बॅनर्जी यांनाही अंतर्गत शेअर घोटाळ्यात दोषी ठरविले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था