वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू -काश्मीरमध्ये शुक्रवारी सायंकाळी 4G इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली. या संदर्भातील माहिती वीज आणि माहिती विभागाचे प्रधान सचिव रोहित कौशल यांनी दिली. तब्बल 550 दिवसांनी ही सेवा सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.4G mobile internet services being restored in entire J&K
– Rohit Kansal J&K Principal Secretary Power & Information
जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा लवकरच बहाल केली जाईल, असे सरकारच्या सूत्रांनी सांगितले होते. सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि दोन केंद्र शासित प्रदेशात त्याची विभागणी केली. तेव्हा 4G हाय-स्पीड मोबाइल डेटा सेवा जम्मू-काश्मीरमध्ये निलंबित केली.
तेव्हापासून ही बंदी तेथे लागू आहे. गेल्या 550 दिवसांपासून तेथे ही सेवा बंद आहे. इंटरनेट सेवा सरकारतर्फे आता पुन्हा बहाल केली आहे.
16 ऑगस्ट 2020 मध्ये प्रायोगिक तत्वावर गंद्रेबाल आणि उधमपूर या दोन जिल्ह्यात 4G सेवा सुरू केली होती. इतरत्र 2G सेवा सुरू ठेवली होती. मात्र 22 जानेवारीला 4G सेवेवरील बंदी ही 6 फेब्रुवारपर्यत लागू केली होती. ही मुदत संपण्यापूर्वीच एक दिवस अगोदर 4G सेवा जम्मू- काश्मीरच्या सर्व भागात आता वापरता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.