पासपोर्टची मुदत संपूनही 4 लाख विदेशी राज्यात

केंद्रीय गृह विभागाने राज्याच्या गृह विभागाला ही माहिती कळवली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी गृह विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली 5 जानेवारीला समिती स्थापन केली. 4 lakh in foreign states even after expiration of passport


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पासपोर्टची मुदत संपूनही महाराष्ट्रात 4 लाख 21 हजार 255 परदेशी नागरिक बेकायदा राहत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

केंद्रीय गृह विभागाने राज्याच्या गृह विभागाला ही माहिती कळवली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी गृह विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली 5 जानेवारीला समिती स्थापन केली. प्रथम अधिकृत पासपोर्टद्वारे काही मंडळी भारतात प्रवेश करतात. त्यानंतर ते अवैधरित्या महाराष्ट्रात ठाण मांडून बसतात.त्यात किती घुसखोर, किती बांगलादेशी, किती पाकिस्तानी यांची गणना करणे तसे अवघडच आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन केली आहे.

4 lakh in foreign states even after expiration of passport

चर्चेची गुऱ्हाळ वेगळीच
एकीकडे राज्यात कंगना विरोधात सरकार अशी खंडाजंगी, तुमचे पत्र, जनाब, औरंगाबादचे संभाजीनगर करणे हे विषय चघळायला नेतेमंडळीना चिकार वेळ आहे. पण, 4 लाखांवर परदेशी नागरिक बेकायदा महाराष्ट्रात राहतात, या गंभीर विषयावर चर्चा होत नाही आणि परदेशी नागरिकांचा हा अफाट आकडाच खरे तर डोके फिरविणारा आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*