कॅपिटॉल हिल हिंसाचारात ४ बळी; अभूतपूर्व धुडगुशीनंतर बायडेनच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचे शिक्कामोर्तब; ट्रम्प यांची आता शांततेत सत्तांतराची तयारी, पण पराभव स्वीकारण्यास नकार

वॉशिंग्टन कॅपिटॉल हिलवरील हिंसाचारात ४ जणांचे बळी गेलेत. तेथे अमेरिकन लोकशाही इतिहासातला २०० वर्षांतला अभूतपूर्व धुडगुस घातला गेलाय. त्यानंतर ज्यो बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचे शिक्कामोर्तब केले आहे. ट्रम्प यांनी एवढे सगळे घडल्यानंतर आता मात्र शांततेत सत्तांतराची तयारी दाखविली आहे. 4 killed in Capitol Hill violence; US Congress seals Biden’s victory after unprecedented turmoil Of Donald Trump Supporters


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : कॅपिटॉल हिलवरील हिंसाचारात ४ जणांचे बळी गेलेत. तेथे अमेरिकन लोकशाही इतिहासातला २०० वर्षांतला अभूतपूर्व धुडगुस घातला गेलाय. त्यानंतर ज्यो बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचे शिक्कामोर्तब केले आहे. ट्रम्प यांनी एवढे सगळे घडल्यानंतर आता मात्र शांततेत सत्तांतराची तयारी दाखविली आहे.

अमेरिकन काँग्रेसने डेमोक्रॅटिक उमेदवार ज्यो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. बायडेन यांना एकूण ३०६ इलेक्टोरल कॉलेजची मते मिळाली. दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प सत्ता हस्तांतरासाठी तयार झाले आहेत. तरी देखील स्वतःचा पराजय झाल्याचे मानण्यास ते अद्याप तयार नसल्याचे दिसते आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी आज वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीमध्ये हिंसाचार केला. इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणीमध्ये अडथळे आणण्याचे त्यांनी प्रयत्न केले. पण अखेर अमेरिकन काँग्रेसने ज्यो बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे.

ज्यो बायडेन यांचा येत्या २० जानेवारीला शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दोन आठवडयांच्या आता सत्तेचे हस्तांतर होईल, असे ट्रम्प यांनी सांगितले. सत्ता हस्तांतरासाठी ट्रम्प तयार झाले असले तरी निवडणुकीचा निकाल मान्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

4 killed in Capitol Hill violence; US Congress seals Biden’s victory after unprecedented turmoil Of Donald Trump Supporters

तत्पूर्वी, अमेरिकेत आज लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारी घटना घडली होती. बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच मोठया संख्येने ट्रम्प समर्थक राजधानी वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीवर धडकले. कॅपिटॉल इमारतीमध्ये अमेरिकन काँग्रेसचे सभागृह आहे. इथे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील इलेक्टोरल मतांची मोजणी सुरु होती. कॅपिटॉल इमारतीत झालेला हा हिंसाचार ट्रम्प यांच्या अनेक सहकाऱ्यांना पटलेला नाही. त्यांनी तात्काळ आपल्या पदाचे राजीनामे दिले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*