हिमनदीच्या तांडवातील 31 मृतदेह सापडले; उत्तराखंडामधील पुरात 206 जण बेपत्ता

वृत्तसंस्था

ऋषिकेश : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी हिमनदीच्या तांडवामुळे आलेल्या पुराने हाहाकार उडवला होता. आतापर्यंत 31 मृतदेह सापडले असून 206 जण बेपत्ता आहेत.31 bodies found in glacier ordeal 206 missing in floods in Uttarakhand

तपोवनच्या जोशी मठ परिसरात एक हिमकडा तुटून ऋषिगंगा नदीत कोसळला होता. धौलीगंगा नदीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने तपोवन धरण, बोगदा, घरे पूर्णपणे भुईसपाट झाली होती. अनेक जण वाहून गेले आहेत. त्यांचा शोध विविध मार्गाने सुरक्षा पथकाने सुरु ठेवला आहे.ऋषिगंगा हायड्रो पॉवर प्रोजेक्टच्या बोगदा 2 मध्ये 35 लोक अडकले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, चिखलामुळे अडथळा होत आहे. बेपत्ता झालेलं 206 लोक विविध राज्यातील प्रामुख्याने उत्तर आणि पश्चिम राज्यातील कामगार आहेत. ते वीज प्रकल्पात काम करण्यासाठी आले होते, अशी माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.

31 bodies found in glacier ordeal 206 missing in floods in Uttarakhand

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*