पाकिस्तानमधली ३०८ ट्विटर हँडल्स शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाबद्दल गोंधळ माजवताहेत; दिल्ली पोलिसांची धक्कादायक माहिती


  • दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चाचा मार्ग पोलिसांनी आखून दिला; विशिष्ट नियमांसह परवानगी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलकांचा कृषी कायद्यांविरोधातील ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्धार करताहेत. पोलिसांनीही त्यांना काही अटींसह परवानगी दिली आहे. पण याच दरम्यान दिल्ली पोलिसांनी एक अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे, तो म्हणजे… पाकिस्तानमधली ३०८ ट्विटर हँडल्स शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाबद्दल गोंधळ आणि गदारोळ माजवत आहेत. या गौप्यस्फोटामुळे सरकारी सुरक्षा यंत्रणा तर सतर्क झाल्याच आहेत. पण शेतकरी नेतेही सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. 308 Twitter handles in Pakistan are making a fuss about the farmers tractor Shocking information of Delhi Police

शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चाचा निर्धार पाहून दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली खरी पण आता नव्या खुलाशानंतर पोलिसांना मोर्चासाठी अधिक बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे सीपी दीपेंद्र पाठक यांनी सांगितले, की पोलिसांचा गुप्तचर विभाग आणि केंद्रीय गुप्तचर विभागाने केलेल्या तपासात हे निष्पन्न झाले आहे, की एकूण ३०८ ट्विटर हँडल्स १३ ते १८ जानेवारी दरम्यान क्रिएट झाले.

ट्रॅक्टर मोर्चा आणि शेतकरी आंदोलन यांच्याविषयी गोंधळ आणि गदारोळ वाढविणारी माहिती त्या अकाउंटवरून जनरेट होते आणि शेअर होते आहे. मुख्य म्हणजे या सगळ्या ट्विटर हँडल्सचे ओरिजिन पाकिस्तानातली शहरे आणि गावे असल्याचे आढळले आहे. आत्ता ३०८ ट्विटर हँडल्स अशी आढळली आहे. अजूनही सायबर क्राइम आणि गुप्तचर विभाग तपास आणि शोधकार्य करत आहेत. त्यातून आणखी ट्विटर हँडल्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उघड होण्याची शक्यता आहे.टॅक्ट्रर मोर्चात खलिस्तानी समर्थक घुसणार असल्याची गुप्तचर विभागाची माहिती आहे. त्यादृष्टीने दिल्ली पोलिस दिल्ली बॉर्डरसह शहरातही बंदोबस्तात वाढ करणार आहे, असेही पाठक यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांची मर्यादित परवानगी

सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाजीपुर बॉर्डर व शहाजापूर बॉर्डर येथून ट्रॅक्टर्स दिल्लीमध्ये येणार आहेत. शेतकऱ्यांना आउटर रिंग रोडवर एकत्रित मोर्चा करायचा होता, मात्र त्याऐवजी दिल्लीतल्या अंतर्गत रस्त्यांवर मर्यादित प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे. सर्व सीमांवरचे ट्रॅक्टर एकत्रित येणार नाहीत तर जिथपर्यंत परवानगी दिली आहे तिथून ते आपापल्या ठिकाणी परत माघारी जाणार आहेत. पोलिसांनी तशा अटीवरच शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी दिली आहे.

प्रजासत्ताक दिनी होणारी ही ऐतिहासिक परेड असेल, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. आधी शेतकऱ्यांनी पोलिसांची बॅरिकेट्स तोडण्याचा इशारा दिला होता पण पोलिसांनीच ते काढण्यास स्वतः मान्य केले आहे. हा शेतकऱ्यांचा विजय आहे. दिल्ली पोलिसांना आणि केंद्र सरकारलाही एक पाऊल मागे जावे लागले आहे.

संपूर्ण जग दिल्लीतील शेतकरी परेड उद्या पाहणार आहे. या दरम्यान शांतता राखण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे. ही अशी ऐतिहासिक शेतकरी परेड असेल जी आधी कधीच झाली नसेल, असे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.

308 Twitter handles in Pakistan are making a fuss about the farmers tractor Shocking information of Delhi Police

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था