3 राफेल विमाने भारतात दाखल ; फ्रान्समधून नाॅन स्टाॅप उड्डाण आता भारतीय वायुसेनेत 11 राफेल


भारतीय वायुसेनेची ताकद वाढविण्यासाठी लढाऊ विमान राफेल फ्रान्समधून उड्डाण करत बुधवारी रात्री उशिरा भारतात पोहोचले. फ्रान्समधील भारतीय दूतावासाच्या म्हणण्यानुसार, फ्रान्समधून निघालेले तीन राफेल सात हजार किलोमीटर पेक्षा अधिक अंतराचे नाॅन स्टाॅप उड्डाण करत भारतात पोहोचले आहेत. 3 Rafale aircraft arrive in India Now 11 Rafale in Indian Air Force


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे, कारण फ्रान्समधील आणखी तीन राफेल लढाऊ विमान नॉन-स्टॉप उड्डाण करत भारतात दाखल झाले आहेत. भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या गतिरोध दरम्यान फ्रान्समधील तीन राफेल विमान रात्री उशिरा भारतात दाखल झाले. सात हजार किलोमीटरहून अधिक अंतर उड्डाण केल्यानंतर हे राफेल विमान थेट भारतीय हवाई दलाच्या विमानतळावर दाखल झाले. या विमानांच्या आगमनाने भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढली आहे.

फ्रान्समधून भारतात येत असताना या विमानांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये हवाई इंधन म्हणजेच हवेत इंधन देण्यात आले.हे इंधन संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट (एमआरटीटी) द्वारा भरण्यात आले. या संदर्भात फ्रान्समधील भारतीय दूतावासांनी माहिती दिली.हवाई दलाने सांगितले की येथे नवीन 3 राफेल विमाने आल्यामुळे या लढाकू विमानांची संख्या आता 11 झाली आहे.गुरुवारी सकाळी 11 वाजता गुजरातमधील जामनगरमध्ये तीन नवीन राफेल लढाऊ विमान उतरले .राफेल विमानांचं तिसऱ्यांदा भारतात पुरवठा झाला आहे. भारतीय वायुसेनेने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्सकडून 59 हजार कोटींमध्ये 36 राफेल विमाने खरेदी केले. तीन नवीन विमानांच्या आगमनानंतर भारताकडे 11 राफेल विमाने आहेत.

भारतीय वायुसेनेने ट्विट केले की, “तीन राफेल विमान काही काळापूर्वी भारतीय हवाई दलाच्या तळावर दाखल झाले. या विमानांनी सात हजार किलोमीटरहून अधिक उड्डाण केले. युएईच्या हवाई दलाने दिलेल्या टँकर मदतीचे आणि भारतीय हवाई दलाचे कौतुक आहे.

२९ जुलैला पाच राफेल विमानांचा पहिला सेट अंबाला एअर बेसवर पोहोचला. नंतर या पाच विमानांना औपचारिकपणे भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. संरक्षण मंत्र्यांच्यासमवेत फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरेन्स, सीडीएस बिपिन रावत आणि हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया देखील उपस्थित होते.

3 Rafale aircraft arrive in India Now 11 Rafale in Indian Air Force

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती