उत्तराखंडात चामोली ते हरिव्दार हाय अँलर्ट; गृहमंत्री – मुख्यमंत्री चर्चा; ६०० जवान मदत आणि बचाव कार्यात मग्न; १५० जण वाहून गेल्याची भीती


वृत्तसंस्था

चामोली : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने धरणाचा बांध तुटला आहे. राज्याच्या चमोलीमध्ये ही घटना घडली. यामुळे मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चामोली ते हरिव्दार हाय अँलर्ट जारी करण्यात आला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग यांच्याशी चर्चा केली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपीचे ६०० जवानांनी मदत आणि बचाव कार्याला सुरूवात केली आहे. 3 NDRF teams have reached there. More teams are ready to be airlifted to Uttarakhand from Delhi

अमित शहा सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उत्तराखंडाला मदतीचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या दौऱ्यातून मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बातचित केली आहे. मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्याचे संचालन करीत आहेत.

चामोली जिल्ह्याच्या रैणी गावाजवळ धरणाचा बांध फुटला. प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले असून, ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले आहेत. तसेच, येथील 100-150 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

उत्तराखंडचे महासचिव ओमप्रकाश यांनी सांगितले की, दुर्घटनेमध्ये 100 ते 150 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. चमोलीच्या तपोवन परिसरात झालेल्या या घटनेने ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्टला प्रचंड नुकसान पोहोचले आहे. येथे काम करणारे अनेक मजूर बेपत्ता आहेत. नदीच्या किनाऱ्यावरील अनेक घरे ही पाण्यात वाहून गेली आहेत. आजुबाजूची गावे रिकामी करण्यात आली आहेत. ऋषिगंगा व्यतिरित्त एनटीपीसीच्या एका प्रोजेक्टलाही नुकसान पोहोचले आहे. तपोवन बैराज, श्रीनगर डॅम आणि ऋषिकेश धरणाचेही नुकसान झाले आहे.

3 NDRF teams have reached there. More teams are ready to be airlifted to Uttarakhand from Delhi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती