लव्ह जिहाद कायद्यावर योगी आदित्यनाथ यांना २२४ माजी आयएएस अधिकाऱ्यांचा पाठिंबा

उत्तर प्रदेशात लव्ह जिहादचा कायदा करणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना २२४ माजी आयएएस अधिकाऱ्यांनी पत्र लिहून पाठिंबा दिला आहे. धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा गरजेचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 224 Former IAS Officers Support Yogi Adityanath on Love Jihad Act


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशात लव्ह जिहादचा कायदा करणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना २२४ माजी आयएएस अधिकाऱ्यांनी पत्र लिहून पाठिंबा दिला आहे. धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा गरजेचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विविध मार्गांनी आमिष दाखवून तसेच धमकावून हिंदू मुलींशी विवाहाचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा मुस्लिम तरुण नाव बदलून हिंदू मुलींना फसवितात आणि त्यांच्याशी विवाह करतात. त्यांना रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहाद कायदा आणला आहे.यावरून राजकारण गरम झाले आहे. यापूर्वी १०४ अधिकाऱ्यांनी या कायद्याला द्वेषाचे राजकारण म्हणून विरोध केला होता. मात्र, आता २२४ माजी आयएएस अधिकारी पुढे आले आहेत. त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्वत:ला राजकारणापासून दूर म्हणणारे निवृत्त अधिकारी एका जातीबाबत पक्षपाती दिसत आहेत, ही चिंतेची बाब आहे. सत्ताधाऱ्यांना विरोध करण्याचा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. या अधिकाऱ्यांनी अशा पध्दतीचे वक्तव्य करून भारतीय घटना आणि आयएएस अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन केली आहे. भारताच्या एकतेला आणि अखंडतेला तडा देण्याचा या अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे, असे फोरम फॉर कन्सर्ड सिटिझन्स या संघटनेने म्हटले आहे.

224 Former IAS Officers Support Yogi Adityanath on Love Jihad Act

या संघटनेचे सदस्य असलेले निवृत्त अधिकारी योगेंद्र नरेन म्हणाले, गैरमार्गाने होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी धर्मांतर विरोधी कायदा आवश्यक आहे. यातून अशा पध्दतीच्या प्रकारांवर त्यातून लक्ष ठेवता येईल. उत्तर प्रदेश सरकारने हा कायदा बनवून योग्य पाऊल उचलले आहे. एखाद्याला धर्मांतर करायचे असेल तर त्याला कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागेल. सरकारला ही गोष्ट ठरविण्याचा निश्चितच अधिकार आहे की धर्म परिवर्तन कशा पध्दतीने व्हायला हवे. जनतेने निवडून दिलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कायदा करण्याचा अधिकार आहे. या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी न्यायालय आहेत. अनेक वृत्तपत्रांमध्ये जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या घटनांबाबत लिहिले आहे. त्यामुळे धर्मांतर विरोधी कायदा करण्याची ही अत्यंत योग्य वेळ आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*