2020 Tree City Of The World : हैदराबाद जागतिक स्तरावरील 51 शहरांमध्ये भारताचे एकमेव ‘ट्री सिटी’ म्हणून घोषित

  • हरिता हराम कार्यक्रमाच्या अंतर्गत ग्रीन कव्हर सुधारण्याच्या प्रयत्नांची ही पावती

वृत्तसंस्था

हैदराबाद : हैदराबाद ला आर्बर डे फाउंडेशन आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) “2020 ट्री सिटी ऑफ वर्ल्ड” म्हणून मान्यता दिली आहे. शहरी वनांच्या संवर्धनासाठी शहराची बांधिलकी लक्षात घेता ही मान्यता देण्यात आली आहे. अशी मान्यता मिळालेले हैदराबाद हे देशातील एकमेव शहर आहे. 2020 Tree City Of The World : Hyderabad declared as India’s only ‘Tree City’ out of 51 cities in the world

51 शहरांना हरवून अव्वल हैदराबाद

या कार्यक्रमाच्या दुसर्‍या वर्षात हैदराबादने जगातील इतर 51 शहरांना मागे टाकत “2020 ट्री सिटी ऑफ वर्ल्ड”
ही ओळख मिळविली आहे, तर आतापर्यंतची अशी ओळख मिळवणारे भारतातील हे एकमेव शहर आहे. यात सहभागी बहुतेक शहरे यूएसए, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलियासह इतर देशातील आहेत.या आंतरराष्ट्रीय मान्यतेबद्दल शहराचे अभिनंदन करताना फाउंडेशनचे अध्यक्ष डॅन लाम्बे म्हणाले, “आपले शहर म्हणजे शहरी आणि सामुदायिक जंगलांचा मार्ग प्रशस्त करणारे महत्त्वपूर्ण जागतिक नेटवर्कचा भाग आहे.”

आयटी मंत्री केटी रामा राव यांनी या कामगिरीबद्दल ट्विट केले की, “ मला हे सांगताना आनंद होतो आहे की, आर्बर डे फाउंडेशनने (जे यूएनच्या एफएओबरोबर काम करते) हैदराबादला जगातील एक ‘ट्री सिटी म्हणून मान्यता दिली आहे .या यादीमध्ये समाविष्ट होणारे हे एकमेव भारतीय शहर… हरिता हराम कार्यक्रमाच्या अंतर्गत ग्रीन कव्हर सुधारण्याच्या आमच्या प्रयत्नांची ही पावती आहे, ”

2020 Tree City Of The World : Hyderabad declared as India’s only ‘Tree City’ out of 51 cities in the world

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*