दोन वर्षांपासून देशात 2 हजारांच्या नोटेची छपाई नाही; केंद्र सरकारकडून संसदेत माहिती

गेल्या दोन वर्षांत दोन हजार रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नसल्याची माहिती केंद्र शासनाच्या वतीने संसदेत देण्यात आली आहे. नोटांची संख्या कमी होऊनही छापल्या गेल्या नाहीत. 2000 currency notes not printed in last two years govt in loksabha


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांत दोन हजार रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नसल्याची माहिती केंद्र शासनाच्या वतीने संसदेत देण्यात आली आहे. नोटांची संख्या कमी होऊनही छापल्या गेल्या नाहीत.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हणाले एप्रिल २०१९पासून देशात दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई झालेली नाही. केंद्र शासनानं पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांचं वितरण थांबवून दोन हजार रुपयांची नोट छापण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर पाचशे रुपयांच्या नव्या नोटा छापण्यात आल्या. पण गेल्या दोन वर्षांत दोन हजार रुपयांच्या नोटा मात्र छापण्यात आलेल्या नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार कोणत्या मूल्याच्या नोटा छापायच्या याबाबतचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात येतो. लोकांकडून होणारी देवाणघेवाण आणि मागणी लक्षात घेऊन कोणत्या मूल्याच्या नोटा छापायच्या याबाबतचा निर्णय होत असतो.

काळ्या पैशांना लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने 2016 साली नोटबंदी केली. त्याचवेळी अचानक 2000 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या कमी झालेली असतानादेखील नोटांची छपाई करण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षांत 2000 रुपयांच्या नोटांची छपाई झालेली नाही. 30 मार्च 2018 ला 3362 दशलक्ष 2000 च्या नोटा होत्या तर 26 फेब्रुवारी 2021 रोजी 2000 रुपयांच्या नोटांची संख्या कमी झाली आहे. या कालावधीत 2499 दशलक्ष नोटाच होत्या. दोन वर्षांपासून दोन हजारांच्या नोटांची प्रिटिंग बंद आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.

2000 Rs Note: Printing of Rs 2,000 notes has been Stopped By RBI From Last Two Years Says MoS Anurag Thakur
2000 Rs Note: Printing of Rs 2,000 notes has been Stopped By RBI From Last Two Years Says MoS Anurag Thakur

2000 currency notes not printed in last two years govt in loksabha

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*