बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षे तुरुंगात खितपत पडलेल्या व्यक्तीची निर्दोष सुटका

वृत्तसंस्था

आग्रा : उत्तरप्रदेशात बलात्काराच्या आरोपाखाली गेली 20 वर्ष एकजण तुरुंगात खितपत पडला होता. अखेर अलाहाबाद उच्च न्यायालयाने तो निर्दोष असल्याचा निकाल जानेवारीत दिला. त्यानंतर त्याची आग्रा तुरुंगातून बुधवारी सुटका झाली.20 years in prison on rape charges Innocent release of an angry person

विष्णू तिवारी (वय 43), असे त्याचे नाव आहे. सूटकेनंतर तो उत्तरप्रदेशातील आपल्या ललीतपुर जिल्ह्यातील गावी जाणार आहे. शेतात महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी 26 सप्टेंबर 2000 रोजी त्याला अटक झाली होती.त्याला बलात्कार आणि अस्ट्रोसिटी कायद्याअंतर्गत अटक केली होती. तीन वर्षांनंतर लालीतपुर न्यायालयाने त्याला दोषी ठरवून 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. एस/ एसटी कायद्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

या शिक्षा एकाच वेळी भोगण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले होते. या प्रकरणाचा निकाल अलाहाबाद न्यायालयाने देताना असे म्हंटले आहे, की महिलेवर जबरदस्ती केली गेली. परंतु वैद्यकीय अहवालानुसार महिलेवर बलात्कार झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. या प्रकरणातील 3 साक्षिदार, पुरावे याचा विचार करता न्यायालय त्याची निर्दोष सुटका करत आहे.

मी गेली 20 वर्ष तुरुंगात होतो. आता पुढे काय करायचे असा प्रश्न आहे. माझ्या शरिराबरोबरच कुटुंब मोडले आहे. मला धाकटा भाऊ आहे. मी अविवाहित असून तुरुंगातील स्वयंपाकघरात काम करताना माझ्या हाताला बसलेले हे चटके पाहा. सुटका झाल्यावर तुरुंग प्रशासनाने मला 600 रुपये दिले. ते तेव्हढेच माझ्याकडे आहेत.
विष्णू तिवारी

20 years in prison on rape charges Innocent release of an angry person

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*