निकृष्ट वस्तू ग्राहकांच्या माथी मारणाऱ्या 184 चीनी वेबसाईटवर घातली बंदी ; सौदी अरेबिया सरकारची कडक कारवाई

वृत्तसंस्था

रियाध : सौदी अरेबियातील नागरिकांना निकृष्ट आणि भेसळयुक्त वस्तू खोट्या ऑफरद्वारे विकून ग्राहकांना फसविणाऱ्या 184 चीनी वेबसाईटवर बंदी तेथील सरकारने घातली आहे. 184 Ban on Chinese websites

जुन्या वस्तूच्या बदल्यात नवी वस्तू ग्राहकांना देण्याचे आश्वासनही या वेबसाईट पाळत नसल्याचे दिसून आले आहे. ज्या वस्तू दिल्या जातात, त्याची गुणवत्ता चांगली नाही.वेबसाईटवर बंदी घातल्यामुळे चीनला मोठा दणका बसला आहे. परंतु गोम अशी आहे की, एक वेबसाईटवर बंदी घालताच पाच नव्या बेबसाईट या कंपन्या लॉंच करत आहेत. तसेच नव्याने व्यवसाय सुरु करत आहे. ही बाब सौदी सरकारची नवी डोकेदुखी बनली आहे.

ग्राहकांना एकाच वेळी आकर्षित करण्यासाठी या वेबसाईट सुरु केल्या गेल्या होत्या. आता त्यावर एकाच वेळी बंदी घातली गेली आहे. त्याचा फटका चीनला मोठा बसणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, परफ्युम, पिशव्या, शूज, कपडे आणि सौंदर्यप्रसाधने यासारखी ग्राहक उत्पादने या ऑनलाइन वेबसाइट्समार्फत विकली जात होती.

184 Ban on Chinese websites

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*