पॉपस्टार रिहानाला ट्विट करण्यासाठी खलिस्तानवाद्यांकडून तब्बल 18 कोटी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पॉपस्टार रिहानाला खलिस्तानवाद्यांशी संलग्न असलेल्या संस्थने 18 कोटी दिले असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याचा मागणीसाठी दिल्ली सीमेवर गेल्या 60 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.18 crore from Khalistanis for tweeting popstar Rihanna

त्यात अनेक परदेशी सेलिब्रेटी नाक खुपसत आहेत. आता या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त करून देण्यासाठी तसेच समुदायाचे आंदोलनाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी खलिस्तानवाद्यांनी खटाटोप सुरु केले आहेत,हे यातून स्पष्ट होत आहे.शेतकरी आंदोलन अधिक वेगाने सुरु व्हावे, यासाठीपॉपस्टार रिहानाला ट्विट करण्यासाठी 18 कोटी(2.5 दशलक्ष डॉलर) दिले आहेत. खलिस्तानवाद्यांशी संलग्न असलेली कॅनडा येथील पोएटिक जस्टीसफाउंडेशनकडून ही रक्कम दिल्याचे वृत्त आहे.

ही संस्था कॅनडामधून जगभरात विविध राजकीय नेते आणि संघटनांच्या मदतीने आंदोलनाला पाठींबा देते. त्या अंतर्गत खलिस्तानवादी चळवळीचे संचालक धालीवाल यांनी रेहनाला ट्विट करण्यासाठी भली मोठी रक्कम मोजली आहे.
पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला आंदोलनाचीरुपरेषा ठरविण्याचे जे टूल किट ही या संस्थने पुरविले आहे. धलीवाल यांच्यासह संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी मरिना पॅटरसन, कॅनडातील वर्ल्ड शीख ऑर्गनायझेशनच्या संचालक अनिता लाल, कॅनडाचे खासदार जगमीत सिंग यांनी हे षडयंत्र रचले आहे.

अनिता लाल या संस्थेच्या सहसंस्थापिक असून त्यांनी टूल किट ग्रेटा थनबर्गला पुरविले आहे. त्या नंतर रिहाना हिने शेतकरी आंदोलनाबद्दल कोणीच काही का बोलत नसल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर अनेक परदेशी सेलिब्रेटींनी आंदोलनात उड्या घेतल्या.

त्यात ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांचा समावेश होता.गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे टूल किट तयार केले गेले. 23 जानेवारी आणि 26 जानेवारीला याचा प्रभावी वापर करून देशात अशांतता निर्माण केली गेली.

परंतु या दुष्पप्रचाराविरोधात भारतीय अभिनेते, क्रिकेटपटू आणि अन्य मान्यवरांनी आमच्या देशांतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करू नका, असा सज्जड दम देऊन इंडिया टुगेदार मोहीम राबवून चोख उत्तर दिले आहे.

18 crore from Khalistanis for tweeting popstar Rihanna

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*