फूल क्या चीज हैं तेरे कदमों में हम ……17 वर्ष भारत मातेची सेवा ; गावकर्यांनी केले अनोखे स्वागत ; व्हिडिओ व्हायरल

  • फूल क्या चीज हैं तेरे कदमों में हम भेट अपने सरों की चढा जायेंगे …असे म्हणत हसत हसत देशासाठी प्राण देण्यास सज्ज असणार्या सैनिकांना सलाम ..आणि देशसेवा करून परतणार्या या सैनिकांचे असे स्वागत करणार्या त्या गावकर्यांना देखील सलाम ….17 years of service to Mother India Unique welcome by the villagers Video viral
  • नीमच जिल्ह्यातील जीरन गावात 60 लोक सैन्यात कार्यरत आहेत. या सैनिकांपैकी एक, विजय बहादुरसिंग, 17 वर्ष सैन्यात नोकरीकरून निवृत्त झाले . गावकर्यांनी या वीराचे जंगी स्वागत करत त्यांना खास सरप्राईज दिले …..

विशेष प्रतिनिधी

नीमच : सीमेवर तैनात असलेले सैनिक विजय बहादुरसिंग , 17 वर्ष देशसेवा पूर्ण केल्यावर आपल्या गावी परतले .तेंव्हा कल्पनाही केली नव्हती अशा प्रकारे त्यांचे स्वागत करण्यात आले.हा स्वागत सोहळा संपूर्ण देशात मिसाल ठरत आहे .

मध्य प्रदेश मधील निमच जिल्ह्यात ग्रामस्थांनी सेवानिवृत्त होऊन परत आलेल्या सैनिकाचे मन जिंकले आहे. स्वागताचा हा व्हिडिओ पाहून सैनीकासह लोक गावातील लोकांनाही अभिवादन करत आहेत . ग्रामस्थांचे प्रेम आणि आदर पाहून सेवानिवृत्त सैनिक विजय बहादुर सिंग देखील भावूक झाले .

 गावात त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशाची व्यवस्था करण्यात आली होती. नायक विजय बहादुरसिंग आपल्या गावी परत येताच संपूर्ण गाव त्यांचे स्वागत करण्यास सज्ज झाले . विजय गावात पोहोचताच लोकांनी त्यांचे पाय जमिनीवर पडू दिले नाहीत . गावकर्यांनी आपल्या हाताच्या तळव्यांच्या पायघड्या घातल्या आणि त्यावर चालत विजय बहादुरसिंग यांनी आपल्या मायभूमिवर पाऊल ठेवले .

वास्तविक, निमच जिल्ह्यातील जीरण गावातील तब्बल 60 लोक सैन्यात काम करत आहेत. या सैनिकांपैकी एक, विजय बहादुरसिंग, 17 वर्षाच्या सैन्याच्या नोकरीतून निवृत्त झाले आणि आपल्या गावी पोहचले . तेंव्हा गावातील लोकांनी त्यांना आश्चर्यचकित केले. रिटायर्ड फौजी विजय बहादूर शहरातून प्रथम गावात पोहोचले, जिथे त्यांना गावचे प्राचीन मंदिर पहायचे होते. त्यांच्यासाठी गावकर्यांनी कार्पेट ऐवजी जमिनीवर तळवे ठेवले, त्यावर चालत विजय बहादुर सिंग यांनी गावातील प्राचीन गणेश मंदिर गाठले. त्यानंतर ग्रामस्थांनी मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत केले .

सोशल मीडियावर विजय बहादूरच्या स्वागताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी देशभक्तीपर गाणीही ऐकायला मिळत आहेत . या गावात सुमारे 60 लोक सैन्यात नोकरी करतात. विजय बहादुरसिंग आपल्या गावात परत येताच गावकर्यांनी जमिनीवर हात ठेवून सैनिकाला पायघड्या घातल्या नंतर त्यांना पुष्पहार घातला व त्यांना गावातल्या गणेश मंदिरात नेले. असे स्वागत पाहून विजय बहादूरही भावूक झाले. आपल्या गावकर्‍यांचे प्रेम पाहून विजय बहादुरसिंग यांनी आपल्या या प्रेमापुढे शब्द सुद्धा कमी पडत आहेत अशी प्रतिक्रिया दिली

17 years of service to Mother India Unique welcome by the villagers Video viral

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*