अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात नायजेरमध्ये १३७ ठार

वृत्तसंस्था

नायजेर : नायजेरियामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात शंभराहून अधिक नागरिक मारले गेले आहेत. मालीलगत असलेल्या नायजेरच्या हिंसाग्रस्त गावात मोटारसायकलस्वारांनी बेछुट गोळीबार केल्याने सुमारे १३७ जण मारले गेले. नायजेर सरकारने या घटनेला धोकादायक हिंसाचार असल्याचे म्हटले आहे. 137 persons killed in Nigeria

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी घेतली नाही. नायजेर सरकारचे प्रवक्ते अब्दुर्रहमाने जकरिया यांनी रविवारच्या हल्ल्याला आज दुजोरा दिला.जानेवारीत तोंकम्बगो आणि जरोमदारे गावातही हल्ले झाले होते. त्यात किमान शंभर लोक मारले गेले होते. त्यादिवशी नायजेरिया सरकारने २१ फेब्रुवारी रोजी अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली होती. त्याचवेळी एक आठवड्यापूर्वी झालेल्या हल्ल्यात ६६ जण मारले गेले होते.

या घटनेने साऱ्या देशात खळभळ माजली आहे. मुळातच अशांत असलेल्या या देशात आणखी अराजकता माजण्याचा धोका यातून निर्माण झाला आहे.

137 persons killed in Nigeria

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*